खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान!

0

एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात. सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यानेमुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे.

मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते.

निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे. धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांचा Total lipid, Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली. म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो.

काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या लोकांना पुरणाची पोळी खपली गव्हाची लागते. सध्या शहरातील रहाणाऱ्या लोकांना ह्या गव्हा बद्दल फारशी ओळख पण नाही ये आणि दुर्दैवाने तो सहज उपलब्ध पण नाही.

आयुर्वेदात गव्हाचे वर्णन बळ देणारा, विर्य वाढवणारा, बृहण करणारा म्हणजे पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे.

– या गव्हाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पोळीला लालसरपणा असतो आणि ती अधिक चविष्ट लागते. आज मात्र खपली गव्हाचा वापर अतिशय कमी होत चालला आहे.
– काही वर्षांनी कदाचित तो मिळायचाच बंद होण्याची भीती आहे.

खपली गव्हा पासून पुरणपोळी,खीर व लापशी सारखे छान पदार्थ बनतात. काळाच्या ओघात तो लुप्त होऊ लागला आहे. आजकाल मधुमेहासाठी डॉ कटाक्षानं खपली गहू खा म्हणून सांगत आहे, हा *गहू प्राचीन भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. गव्हाची ही जात साधारणपणे ५००० वर्षांपूर्वीपासून भारतात होती. असे म्हणतात. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हाच गहू वापरायला सांगतात कारण याने माणसाच्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम होत नाहीत आणि मधुमेह व इतर विकार होत नाहीत. मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येतो.

सध्या हा गहू फारच कमी ठिकाणी मिळतो. Hybrid गव्हाची चपाती आणि खपली गव्हाची चपाती यात खूप फरक आहे.

खपली गव्हाची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ;- 

१) खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ति वाढविणारा आहे.
२) खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग,बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.
३) खपली पचावयास हलका आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.
४) या गव्हापासून बनविलेली चपाती/पोळ्या चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गोडसर असते.

Leave a comment