बाजरीपासून तयार करा अळीनाशक सामग्री…

0

आपण शेतातील कीड व अळी नियंत्रणासाठी रसायनात भरपूर पैसे घालवतो. प्रामुख्याने रसायनांचा वापर हा भाजीपाला वर्गीय पिकांसाठी होतो. भाजीपाला म्हंटल कि अळीची समस्या हि फार मोठी बाब आहे. रसायन फावारलेला भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपण जाणता …. आज आपण बिगर रासायनिक औषधांबद्दल माहिती घेऊ.

बाजरीपासून तयार करा अळीनाशक सामग्री

१) एक किलो बाजरीचे पीठ घ्यावे
२) एक बारके तोंड असलेले १५ लिटरचा तेलाचा / डालड्याचा डब्बा
३) १० लिटर पाणी इत्यादी वस्तू लागतात.

पद्धत

एक किलो बाजरीचे पीठ १० लिटर पाण्यात चांगले मिसळून घ्यावे. आता हे तयार झालेले मिश्रण १५ लिटरच्या डब्ब्यात ओतावे. आता दाब्ब्याचे तोंड झाकून घ्यावे व त्यात हवा जाणार नाही याची काळजी घेत त्याला झाकून घ्यावे. आता हा डब्बा उकिरड्यात ( शेण टाकायची जागा ) ४-५ फुट खोल पुरावा साधारणपणे ५० दिवस हा डब्बा पुरून ठेवावा. ५० दिवसानंतर हा डब्बा बाहेर काढून सरळ फवारणीसाठी वापरावा. हे औषध २ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावा. या औषधात मोठ्यात मोठी अळी मारण्याची क्षमता आहे.

शरद बोंडे

९४०४०७५६२८

Leave a comment