फ्लॉवर आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते. क्रूसिफेरस या प्रकारातील ही भाजी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून लढण्यासाठी प्रभावी ठरते. शरीराला स्वस्थ्य ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत.
वजन कमी करण्यासाठी –
फ्लॉवरमध्ये इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत कार्बोहायटड्रेट अधिक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर आहे. १०० ग्रॅममध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरी आणि ३-५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.
फायबरची भरपूर मात्रा –
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेच्या सुरळित कामासाठी आवश्यक आहे.
गर्भावस्था –
फ्लॉवरमध्ये असलेलं फॉलिक ऍसिड केवळ महिलांच्या आरोग्यासाठी नाही, तर गरोदर महिलेच्या होणाऱ्या बाळासाठीही महत्त्वपूर्ण आहे. यामुळे विकसनशील गर्भाच्या न्यूरल ट्यूबच्या दोषांचा धोका कमी होत असल्याची शक्यता असते.
शरीरासाठी फायदेशीर –
फ्लॉवर शरीरासाठी फायदेशीर असणारं कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील ७७ टक्के, व्हिटॅमिन Kचे २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असतं.
हृदयरोग –
फ्लॉवरच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारतं. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ६ रक्तातील होमोसिस्टीन नियमित करण्यास मदत करते.
कॅन्सरशी लढण्यास प्रभावी –
फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडेन्ट असतात, ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांची प्रभावीता कमी होते. फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेलं ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसानापासून वाचवतात आणि पेशींचं आरोग्य चागंलं राखण्यास मदत करतात.