Dairy Udyog: सरकारच्या मदतीने सुरु करा डेरी व्यवसाय,मिळेल चांगले उत्पन्न

0

शेती करताना जर तुम्हाला शेतीला जोडधंदा म्हणून एखादा चांगला व्यवसाय करायचा विचार असेल तर तुम्ही कमी गुंतवणुकीत डेरी व्यवसाय करू शकतात. या व्यवसायामध्ये नुकसानीची शक्यता फारच कमी असते. डेअरी व्यवसाय मध्ये तुम्ही दुधाचे प्रॉडक्ट बनवून ते विकून चांगला नफा कमवू शकता.

डेअरी प्रोडक्ट आणि डेरी व्यवसायाला बारा महिने चांगली मागणी असते. या व्यवसायात तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतात.

 पंतप्रधान मुद्रा योजना ठरेल या व्यवसायासाठी सहाय्यभूत

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारत सरकार ही मदत करते. छोट्या व्यवसायासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत लोन देते.केवळकर्जत नाही तर सरकारपैशानं सोबत  प्रोजेक्ट बाबत संपूर्ण माहिती देते. डेअरी प्रोडक्ट साठी एकूण कॉस्ट 16.5 लाख इतकी आहे. परंतु सरकार या फंडच्या 70 टक्के लोन देते. ज्याला कुणाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल अशा व्यक्तीला स्व भांडवल पाच लाख रुपये इतके टाकावे लागते व उर्वरित साडेसात लाख रुपये टर्म लोन आणि चार लाख रुपये वर्किंग कॅपिटल स्वरूपात बँक देते.

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रकल्पानुसार डेअरी व्यवसायात वर्षाला 75000 फ्लेवर्ड मिल्क व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर बटर आणि साडेचार हजार किलोग्राम तुपाचा व्यवसाया याद्वारे होऊ शकतो. म्हणजे जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नवर होऊ शकतो.ज्यात 74 लाख कॉस्टिंग होईल तर चौदा टक्के व्याजाने नंतर जवळपास आठ लाखांचे बचत होऊ शकते.

 या व्यवसायासाठी लागणारे जागेची आवश्यकता

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक हजार स्क्वेअर फूट जागेची गरज लागते.ज्यामध्ये पाचशे स्क्वेअर फुटप्रोसेसिंग एरिया, 150 स्क्वेअर फुट मध्ये रेफ्रिजरेटर रूम, 150 स्क्वेअर फुट मध्ये वॉशिंग एरिया,शंभर स्क्वेअर फुट जागा ऑफिस साठी आणि इतर सुविधांसाठी लागू शकते.

लागणारा कच्चामाल

प्रति महिन्याला 12 हजार 500 लिटर दूध खरेदी, 1000 किलो ग्रॅम साखर, दोनशे किलोग्राम फ्लेवर्स, 625 किलो मसाले खरेदी करावे लागू शकतात.

 या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा नफा..

82.5 लाख टर्नवर मध्ये वार्षिक गुंतवणूक 74.40 लाख रुपये आहे. ज्यामध्ये 14 टक्के व्याज समाविष्ट आहे म्हणजेच 8.10 लाख रुपये वार्षिक नफा राहू शकतो.

Leave a comment