गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, अबू आझमी यांचे वक्तव्य
मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी मोर्चाच्या ठिकाणी अनेक राजकीय नेते आणि शेतकरी नेते उपस्थित आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, तिस्ता सेटलवाड, अशोक ढवळे आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित आहेत. यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही शेतकरी मोर्चाला पाठिंबा देत कार्यक्रमाला हजेरी लावली.
शेतकरी आंदोलकांकडून सुरू असलेल्या लढाईचं आणि त्यांनी दाखवलेल्या मनोधैर्याचं कौतुक यावेळी अबू आझमी यांनी केलं. “गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाच हवेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना संपविण्याचं काम करत आहे”, असं अबू आझमी यावेळी म्हणाले
अबू आझमी यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलकांना मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी प्रोत्हासन केलं. “शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या जाचाला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी यानिमित्ताने पंजाब, हरियाणासह देशातील सर्वच शेतकऱ्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि माझ्या शेतकरी बांधवांनी आणखी तीव्रतनं सरकारला आपलं महत्व दाखवून द्यावं”, असं अबू आझमी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या : –
मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले
हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का?
‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, आझाद मैदानात झळकवले पोस्टर्स