आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली ? वाचा सविस्तर…

0

आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं.पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं,बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहीत.आयसियु मध्ये ऍडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देत जगवावी लागतात.पेपर मल्चिंग केल्याशिवाय टोमॅटो सारखे पिक येतच नाहीं.भाजीपाला,कडधान्य, डाळिंब,द्राक्ष,ऊस,कापूस,केळी, सारख्या पिकांमध्ये उत्पादनात सातत्य टिकवणे व नवनविन रोगांचा सामना करण्यास शेतकऱ्यांची दमछाक होतेय.

काय चुकतेय ?
आपण एकमुखाने उत्तर द्याल,’ जमिनीचा कस कमी झाला आहे!’ अगदी बरोबर उत्तर आहे,पण आपण कधी विचार केलाय का? की जर शेतकरी प्रत्येक पिकाला सर्व खते,मायक्रोन्युट्रिएन्ट,औषधो व पोषके आवश्यक प्रमाणात टाकतोय तरीही जमिनीचा कस कमीच का होत आहे ? अरे हा ‘कस’ म्हणजे नेमकं आहे तरी  काय? नेमकी चूक होतय कुठे ? हा कस म्हणजे काय?
कस म्हणजे “काळी कसदार” या शब्दातील कस होय…जमिनिला हा काळा रंग त्यात असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे येतो व सेंद्रिय कर्ब म्हणजेच ह्युमस किंवा ऑरगॅनिक कार्बन होय! मग आपल्या प्रचलित खत व्यवस्थापन मध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन का होत नाहीं ?असे प्रश्न उपस्थित होतात.
त्यांचे उत्तर समजुन घेण्यासाठी आपल्याला खालिल माहिती उपयुक्त ठरेल.

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलेले काही शास्त्रीय ( सायंटिफिक ) तथ्य आपल्या आजपर्यंतच्या मान्यतांना धक्का देणारी आहेत ! मित्रहो संशोधनात असे आढळुन आलेले आहे की सजिवांचे (मानव, वनस्पति, प्राणी सर्वच ) संतुलित पोषण होण्यासाठी एकुण ७५ मुलद्रव्यांची गरज असते. ७५ पैकी १६ (१८) मुलद्रव्यांची सामान्यपणे गरज असते.७ मायक्रोन्युट्रिएन्ट (कॉपर ,झिंक, बोरॉन,फेरस, मँगेनिज, माॅलिब्डेनम व क्लोरीन / निकेल / कोबाल्ट ),३ दुय्यम(कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ) ३ मुख्य मुलद्रव्ये(नायट्रोजन,फॅास्फोरस, पोटॅश ).एकुण झाले १३ मग कोणते तिन उरले ? नैसर्गिक घटक ३ (कार्बन,ओक्सिजन व हायड्रोजन)

मित्रहो ,ज्या प्रमाणे साधे निर्जीव सिमेंट काँक्रीट करायचे म्हटले तरी वाळु ,खड़ी, सिमेंटचे विशिष्ट प्रमाण घ्यावे लागते त्याप्रमाणे जिवंत वनस्पतिची सुदृढ़ वाढ करण्यासाठी या १६ मुलद्रव्यांचे पोषण ठराविक प्रमाणच लागत असते.आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल वनस्पतितील या घटकांचे प्रमाण जेव्हा प्रयोगशाळेत तपासले गेले तेव्हा ड्राय प्लांटचे एकुण वजनापैकी ९४ % प्रमाण हे कार्बन ,ऑक्सिजन व हायड्रोजन या तीन मूलद्रव्यांचे भरले अर्थात म्हनुनच कोणताही प्राणी किंवा वनस्पति जाळली असता शेवटी राख शिल्लक रहाते ज्यात ९५ % पेक्षा अधिक कार्बनच असतो,म्हणजे वनस्पतित उरलेल्या १३ घटकांचे केवळ ६ % प्रमाण आहे.म्हणजे आजचा शेतकरी आपला ८५ % खर्च या ६ % पोषणासाठी करतो आहे. आपल्या पुर्वजांनी शेकडो वर्ष शेती करुनहि जमिनिचा कस टिकवुन ठेवला.कारण त्यांचे १००% पोषण हे सेंद्रिय घटकांवर अवलंबुन होते त्याद्वारे भरपूर ह्युमस उपलब्ध व्हायचा व नैसर्गिक घटकांचेच ( कार्बन ) मोठ्या प्रमाणात पुनर्भरण केले जायचे,आजचा शेतकरी हेच ९४ % चे पोषण निसर्गावर सोडुन देउन नशिबाला दोष देतो आहे.

याचा परिणाम असा झाला कि निसर्गातिल कार्बनचे चे संतुलन बिघडले आहे,आकडेवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की हवेत कार्बन डायॅाक्साइडच्या वायु रुपातील कार्बनचे प्रमाण वाढते आहे व जमिनितील घन सेंद्रिय कार्बनचे प्रमाण घटत आहे, ४० -५० वर्षापुर्वी ३-४ % असलेला सेंद्रिय कर्ब आज दहा पटिने घसरुन ०.३ – ०.५ या चिंताजनक पातळीवर खाली आला आहे. याचा अर्थ स्पष्टच आहे, की आपल्या खत व्यवस्थापन पद्धतित दृष्टिकोणात मोठा बदल करण्याची गरज आहे, कारण हा जमिनितील सेंद्रिय कार्बन सुपीक मातीतील जिवाणुंच्या ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे, हेच जिवाणु पिकाच्या अपटेक सिस्टमचे (चिलेशन) प्रमुख शिलेदार आहेत.

अर्थात हि संपूर्ण पिकाची अन्नसाखळी विस्कळित होण्यास कारण आहे जमिनितील कस अर्थात सेंद्रिय कर्बाचे रोज घटत असलेले प्रमाण जर एखादा घटक निसर्ग व्यवस्थेतून अन्नधान्य, भाजिपाला व फळांच्या रुपात काढुन घेत असलो तर दुसऱ्या रुपात त्याची भरपाई तेवढ्याच प्रमाणात करायला हवी.यालाच तर संतुलित पोषण म्हणतात.परंतु दुर्दैवाने त्याचा पुरवठा व संगोपन करण्यासाठी आपण खुप खुप कमी पडत आहोत.
आज शेतीत येणाऱ्या ९५% समस्यांचे प्रमुख कारण वेगवेगळ्या मुलद्रव्यांची कमतरता ( डिफिसिएंसी ) आहे व या कुपोषनाचे एकमेव कारण आहे.शेतकरी वेळोवेळी स्लरी किंवा जिवाणु खते वापरुनयावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात पण ते खुपच तोकडे पडतात.जर जमिनीत जिवाणुंचे पोषण करनारे घटक नसतिल तर अशा प्रतिकूल मातीत ते कित्येक दिवस टिकाव धरु शकतिल हा एक अभ्यासाचा विषय आहे.

म्हणजेच जिवाणुं खतांचे ऍप्लिकेशन  करण्यापुर्वी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन करणे हेच या समस्येचे प्रमुख समाधान आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे,आपण जर आजची शेतकऱ्यांची खतांची मात्रा देण्याची पद्धत पाहिली तर, एक ठोबळ प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये ( मायक्रोन्यूट्रिएंट) ग्राम मध्ये , दुय्यम अन्नद्रव्ये किलो मध्ये व मुख्य अन्नद्रव्ये क्विंटलमध्ये टाकतो,मग नैसर्गिक अन्नद्रव्ये या प्रमाणात वाटली तर टना मध्ये टाकायला हवी.

आपल्या पुर्वजांना हे रहस्य माहित होते,ते जमिनिचा कस ( सेंद्रिय कर्ब ) टिकवुन ठेवत आले व हजारों वर्ष समृद्ध व शाश्वत शेती करत आले,त्यांचे कडे जमिनिचा कस टिकविण्याचा मार्ग होता देशी जनावरांचे वर्षभर साठवलेले कंपोष्ट खत,पुर्ण कुजलेले व कसदार चारा खाउन तयार झालेले,आजच्या संकरीत जनावरांच्या शेणात ह्युमस खुप कमी आहे कारण ते जास्तीत जास्त कस शोषुन घेण्यासाठी तयार केलेले आहे त्यामुळे त्यांच्या शेणात चोथाच जास्त असतो जो जमिनित गेल्यावर कुजण्याऐवजी सडतोच जास्त, त्यामुळे उपयुक्त बॅक्टेरिया उत्पन्न होण्याऐवजी हानिकारक बुरशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते .

“खत नको पण बुरशा आवर” असे पिक शेतकऱ्यांना सांगतंय की काय असे वाटु लागते.काही मित्र यावर स्लरी , जिवामृत असा मार्ग अवलंबुन जमिनिचा कस वाढविण्याचा प्रयत्न करतात पण कायमस्वरुपी समाधान त्यांच्या हाती लागत नाहीं,स्लरी व जिवामृत हे काहि दिवसांपुरते समाधान असु शकते पण हजारों किलो सेंद्रिय घटकांची भरपाई करण्यासाठी हा पर्याय नाही, याची शास्त्रीय बाजु पाहुया, शेतकरी सेंद्रिय कर्बाची भरपाई करण्यासाठी एकरी ३-४ ट्रॅाल्या शेणखत टाकतो आणि एकरी स्लरीत टाकतोय ३०-४० किलो शेण व इतर पदार्थ टाकुन केलेली स्लरी किति काळ पोषण देऊ पुरवू शकनार आहे.म्हणजे एकिकडे ५००० ते ६००० किलो खत व दुसरीकडे ३०-४० किलो ची स्लरी, तुलनाच करने शक्य नाहीं,मोठ्या प्रमाणात याचे व्यवस्थापन व उपलब्ध नसलेले मनुष्यबळ हेदेखिल मोठे आव्हान असते.

कोणाचे समाधान करतोय आपण पिकाचे कि स्वताचे,यामुळेच विशिष्ट मर्यादेच्या पुढे उत्पन्न वाढवणे अशक्य होउन जाते,असा शेतकरी आजच्या स्पर्धेच्या युगात काहीसा मागे पडल्याचा अनुभव करतो.
 
Leave a comment