कुजणे आणि सडणे या दोन्हींत काय फरक आहे? वाचा सविस्तर माहिती

0

१) कुजणे हे चांगल्या सुक्ष्मजीवांचं काम आहे तर सडणे हे वाईट सुक्ष्मजीवांचं

२) ऑक्सिजन उपलब्ध असला तरच कुजण्याची प्रक्रिया घडते, तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यास सडण्याची प्रक्रिया घडते.

मुळं श्वसन करत असतात. ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायॉक्साईड सोडतात. माती जर घट्ट असेल तर अशा वेळी मातीत कार्बन डायॉक्साईड साचत जाईल. परिणामी मुळं घुसमटून मरतील.

म्हणूनच माती भुसभुशीत ठेवण्याकडे आपला कल असावा. नैसर्गिकरित्या हे काम गांडुळं व सूक्ष्मजीव करत असतात.

कोणत्याही झाडाला फुलं येण्याची मुख्य कारणे :

१) झाड मरेल असे वाटते तेव्हा
२) झाडात अन्नाचा भरपूर व समतोल साठा असेल तेव्हा ( म्हणजेच झाडात पुरेसे कर्ब असल्यावर)

याचा अर्थ असा की फुलं येण्यासाठी जास्त औषधं फवारून आपण झाडाला आतून खिळखिळे बनवत असतो. त्याऐवजी जर त्याला आपण योग्य प्रमाणात अन्न देण्यावर भर दिला तर झाडाचं आयुष्यमान वाढण्यात मदत होईल.

♦️ बालपणात (अगदी लहान असताना) झाडाची वाढ जमिनीखाली होत असते. मुळं तयार होतात. साहजिकच खोड व पान यांच्या वाढीकडे झाड त्या काळात दुर्लक्ष करत असतं. म्हणूनच बालपणाच्या काळात पानांची वाढ नाही म्हणून चिंता करायची नसते. तेव्हा पानं कमीच येतात आणि खोडही छोटे असते.

जैवीक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

Leave a comment