पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपई मोझॅक रोग म्हणजे काय ? जाणून घ्या

0

पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.महाराष्ट्रात हा रोग मोठ्या प्रमाणावर पपई वर आढळून येतो. सर्वप्रथम या रोगाची लक्षणे समजून घेऊ.

या रोगात पानावर पिवळसर चट्टे पडतात शिरा मात्र हिरव्या राहतात पाने आकसतात व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते. पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर तेलकट ठिपके दिसतात. फळधारणा कमी होते किंवा होत नाही. फळे न वाढता वाळून पडतात साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा होते आणि फळांची वाढ होत असते त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. फळावर बांगडीच्या आकाराचे किंचित उठावदार ठिपके दिसतात सुरुवातीला ठिपक्याचा आकार एक मिलीमीटर असतो नंतर तो चार ते आठ मिलिमीटर होतो. फळाची वाढ होत नाही व ती वाकडीतिकडी होतात. या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला विषाणू काकडी वर्गीय पिकात आढळतो आणि मावा या कीटकांमुळे या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. कलिंगड, काकडी, चवळी, बटाटा या पिकावरील मावा कीटक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पपईवर करतात. हा विषाणू पपईच्या संपूर्ण झाडाच्या विविध भागात विशेषता वरील भागात असतो परंतु बियात नसतो.

रोगाच्या व्यवस्थापनाविषयी थोडी माहिती घेऊ –  या रोगाचा प्रादुर्भाव विषाणूमुळे होत असल्यामुळे यावर रोग आल्यानंतर करावयाचे उपाय योजने पेक्षा रोग येऊ नये यासाठी करावयाच्या उपायोजना फार महत्वाच्या आहेत बरेच शेतकरी हा रोग आल्यानंतर ज्या गंभीरतेने घेतात त्या गंभीरतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत नाही आणि त्यामुळे पपईचे या रोगामुळे अतोनात नुकसान होते.

या रोगासाठी खालील निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करावी

(१) पपई पिकाची लागवड करताना या रोगासाठी प्रतिकारक वाणाची लागवड करावी.

(२) या रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईची रोपे शास्त्रोक्त पद्धतीने स्वतः घरी तयार करून लागवड करणे केव्हाही चांगले. याकरता साधारणपणे पपई लागवडीच्या अगोदर पंचेचाळीस ते पन्नास दिवस आधी पपईच्या रोपवाटिकेचे नियोजन करावे. त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या जातीचे बियाणे त्याची उगवण क्षमता पॅकिंग चीतारीख बॅच क्रमांक लॉट क्रमांक वैधता आदी बाबी पाहून पक्या बिला सहित दुकानदारांकडून बियाणे खरेदी करावे. बिल आणि पेरलेल्या बियाण्याचे पाकीट जपून ठेवावे. प्रो ट्रे मध्ये लागवडीच्या एक दिवस आधी कोकोपीट पाण्यात भिजत ठेवावे पोयटा माती आणि चांगले कुजलेले शेणखत चाळून घ्यावे 5 किलो कोकोपीट अडीच किलो पोयटा माती अधिक अडीच किलो कुजलेले शेणखत अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक शंभर ग्राम 19 19 19 हे खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून प्रो ट्रे मध्ये भरून घ्यावे. मिश्रणाने भरलेल्या प्रो ट्रे मध्ये 1.5 सेंटीमीटर खोलीवर बी टाकून झारी च्या साह्याने हळूवार पाणी द्यावे बियाणे उगवे पर्यंत प्रो ट्रे पारदर्शक पॉलिथिनने झाकून घ्यावा किंवा प्रो ट्रे पॉलिहाऊस मध्ये ठेवावे. शेतकरी शेतकरी बंधूंनो शुद्ध रोपा पोटी पपईची फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे पपईवर रिंग स्पॉट व्हायरस चा प्रादुर्भाव कमी येण्याकरता फेब्रुवारी महिन्यात पपईची लागवड शेतात करणे चांगले हे लक्षात घेऊन त्याआधी पंचेचाळीस ते पन्नास दिवस अगोदर या पपईच्या रोपवाटिकेचे नियोजन करावे पपईची रोपे तयार करताना रोपवाटिके जवळ कोणत्याही काकडी वर्गीय पिकांची लागवड केली नसावी तसेच रोगग्रस्त बागेजवळ रोपे तयार करू नये जेव्हा आपण बाहेरून पपई रोपे खरेदी करतो त्यावेळेस सर्व शास्त्रोक्त पद्धती वापरून रोगमुक्त रोपे तयार केली आहेत याची आपल्याजवळ शाश्वती नसते त्यामुळे स्वतः शास्त्रोक्त पद्धतीने रोपे तयार करून पपईची लागवड केल्यास बऱ्याच प्रमाणात रिंग स्पॉट व्हायरस या रोगाला प्रतिबंध मिळतो.

(३) पपईच्या रिंग रिंग स्पॉट व्हायरस या रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईची लागवड शेतात फेब्रुवारी महिन्यात करावी फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या पपईवर माव्याचा प्रादुर्भाव कमी राहतो त्यामुळे रोगाचा प्रतिबंध मिळतो.

(४) पपईची लागवड करताना या रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईच्या चारही बाजूने चार लाईन मक्याच्या लावा.

(५) पपई बागेच्या जवळ कोणत्याही प्रकारच्या काकडी वर्गीय पिकाची लागवड टाळावी.

(६) शेतकरी बंधूंनो पपईवर रिंग स्पॉट व्हायरस या रोगाचा प्रतिबंध व्हावा याकरिता पपईच्या पिकास शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन सुरुवातीपासून करून पपईचे झाड सुदृढ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरता माती परीक्षणाच्या आधारावर साधारणपणे 200 ग्रॅम नत्र अधिक 200 ग्रॅम स्फुरद अधिक 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रत्येक वर्षी अशी शिफारस आहे प्रत्येक खताचे समान चार भाग करून लागवडीनंतर पहिल्या तिसऱ्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात पपईच्या झाडास खत झाकून द्यावीत याव्यतिरिक्त प्रत्येक झाडास किमान दहा किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे त्याबरोबर 25 ग्रॅम एझो फोर ओलियम व पीएसबी द्यावे तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विशेषता 0.5 टक्के झिंक सल्फेट ची दर महिन्यात फवारणी केल्यास झाडाची वाढ फळांची वाढ चांगली होते व पपईचे झाड सुदृढ राहण्यास मदत होऊन रोगाचा प्रतिबंध मिळतो.

(७) शेतकरी बंधुंनो पपई पिकावर रिंग स्पॉट व्हायरस ची लक्षणे दिसून येतात पहिले एकटी दुकटे रोगग्रस्त झाड उपटून ताबडतोब नष्ट करावे.

(८) शेतकरी बंधूंनो पपई पिकावर रिंग स्पॉट व्हायरस या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्यामुळे या किडीच्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी निंबोळी तेल फवारणी करताना स्टिकर चा वापर करावा.शेतकरी बंधुंनो पपई पिकावर रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या फवारण्या करण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशी पहाव्यात व लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत रसायनाचा अवास्तव वापर टाळावा हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे प्रतिबंध आणि वर निर्देशित उपायोजना यांचा वापर करून अधिकात अधिक पपईचे उत्पादन आपण घेऊ शकतो कृपया रसायने वापरताना लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच वापरावीत आणि अनेक रसायनांचे मिश्रण एकत्र करणे टाळावे प्रमाण पाळावे रसायने फवारताना सुरक्षा किट चा वापर करावा.

राजेश डवरे                                                                                                                     कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

Leave a comment