पिकांचे रोग म्हणजे काय ? जाणून घ्या

0

पिकांची योग्य प्रकारे वाढ होवून त्याला फळे फुले व्यवस्थित येतात अशा पिकास सर्वसाधरण पणे निरोगी पिके म्हणतात..अशा पिकातील वनस्पतीच्या शरीरातील क्रिया उदा नियमित पेशी विभाजन आणि वाढ, जमिनीतून पाणि तसेच अन्नद्रव्य याचे योग्य प्रकारे शोषन प्रकाश संशेलषणामध्ये तयार झालेल्या अन्नाचे स्थलांतर आणि साठवण पुनरूत्पादन अतिशय नियमितपणे होत असते.ब-याच वेळा पिके रोगग्रस्त अथवा अशक्त राहिल्यामुळे कमकुवत दिसतात अशा पिकापासून योग्य उत्पादन मिळते असे नाही असा पिकास रोग आला असे म्हणतात.

पिकावर काही जिवाणूमुळे अथवा पर्यावरणातील बदलामुळे परिणाम होवून चयापचय क्रियांमध्ये बदल होतो.आणि पिक रोगग्रस्त होतो रोग हि पोषक हवामानात पिक आणि अतिसु जीव यांच्या परस्परक्रियेतून होणारी जैविक घटना असून तिचा झाडावर किंवा त्याच्या काही भागावर विकृती दिसतात त्यामुळे उत्पन्नात घट येते. झाडावर बुरशी ,जिवाणू, विषाणू , मायक्रोप्लाझमा इ अतिसू. जिवाण पासून पिकावर रोग पडतात. वेळीस आपणास ओळखता आला नाही तर पिक हातचे जाते त्यासाठी रोगाचे पिकावर काय परिणाम होते दिसतात.

1) बुरशी :- हे युकॅरियाॅटीक ,हरितद्रव्यविरहित मूलबिंदू (न्युक्विलयस) असलेले एकपेशीय अथवा बहूपेशीय धाग्यापासून शरीर बनलेले अति.सु. जीव असून त्याचे प्रजनन लैंगीक व अलैंगीक पध्दतीने होते पिकांवर आढळून येणारे 80% रोग बुरशीमुळे येतात.

2) जिवाणू:- हा एकपेशीय विविध आकाराचे , छडीच्या आकाराची, लंबवर्तळकार उभट आकाराचे गोलाकार मुलबिंदू असलेले हे अति.सु. जिव असून त्यांचे प्रजनन द्विभाजन पद्वतीने होते.यामुळे पिकावर अनेक प्रकारचे रोग पडतात.

3) विषाणू :- हा संसर्गजन्य ठराविक पिकांवर जगणारे डीएनए , अथवा आरएनए ,न्यूक्लिक आम्ल व प्रथिने असलेले परोपजीवी सुजीव असून त्यापासून विविध रोग होत असतात.आता तर नवनविन रोग या विषाणूमुळे होत आहेत.

आपल्या पिकांवर हवामानाचे वातावरण बदलाचा प्रभाव मुळे रोग बुरशी किडी विषाणू जिवाणू दिसून ते खालील वातावरणात दिसून येते..

1)तापमानाचा विविध पिकांवर कसा परीणाम होतो.

 0-15 अंश, अतिशय कमी तापमान

– रोगाचा आढळरोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– ह्या श्रेणीत कोणतेही पिक वाढवता किंवा विकसित करता येणार नाही. उभ्या असलेल्या पिकाला थंडीमुळे जखमा होतील.

15-25 अंश, कमी तापमान

– रोगाचा आढळ

– मावा, पांढरी माशी, कोळी, पिठ्या ढेकूण, आंब्यावरील नाकतोडे, भुरी आणि अल्टरनेरीया करप्याची शक्यता वाढते.

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– कोबी वर्गीय पिके, बटाटे, गहू आणि मुगाच्या वाढीसाठी चांगले तापमान

25-35 अंश, सामान्य तापमान

– रोगाचा आढळ

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– बहुतेक सर्व खरीप पिकांच्या वाढीसाठी अतिशय चांगले तापमान

35-40 अंश, जास्त तापमान

– रोगाचा आढळ

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– ह्या दरम्यान तापमान असेल तर बहुतेक सर्व पिकांच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परीणाम होतो. उन्हाळी बाजरी हे हवामान सहन करू शकते.पुरेशी सिंचन व्यवस्था असेल तर पपई आणि केळ्यांची लागवड करता येते.

40 अंश, खूप जास्त तापमान

– रोगाचा आढळ

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

फक्त खजुराची निवडूंग झाडे हे तापमान सहन करू शकतात.

2) वाऱ्याच्या वेगाचा विविध पिकांवर कसा परीणाम होतो?

– 1-5 किमी/तास, सामान्य कमी वारा पिकांवर परीणाम काही नाही

-5-10 किमी/तास, सामान्य वारा पिकांवर परीणाम

10-15 किमी/तास, थोडा जास्त वेगात वारा

-पिकांवर परीणाम

-बऱ्याच पिकात फुले गळतात

15-20 किमी/तास, वेगवान वारा

-पिकांवर परीणाम

-फांद्या तुटतात आणि केळीची पाने फाटतात

20-30 किमी/तास, अतिशय वेगवान वारा

– पिकांवर परीणाम

– माती आणि पानांतील आर्द्रता कमी होते आणि झाडांच्या फांद्या तुटतात

– 30 किमी/ तास, वादळ म्हणून गणले जाते

– पिकांवर परीणाम

– सर्व पिकांचे नुकसान करते

3) आर्द्रतेचा विविध पिकांवर कसा परीणाम होतो?

0- 40%, कमी आर्द्रता

– रोगाचा आढळ

– मावा, कोळी आणि भुरी रोगांची शक्यता वाढते

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम
– गहू, बटाटा आणि मूग यासारख्या रब्बी पिकांची सामान्य वाढ आणि विका

41-65%, मध्यम आर्द्रता

– रोगाचा आढळ

– मावा, कोळी, भुरी आणि पिठ्या ढेकूण यांची शक्यता वाढते.

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम
– कपाशी, भात, भुईमूग, मूग आणि पपई सारख्या खरीप पिकांची भरघोस वाढ

66-80%, जास्त आर्द्रता

– रोगाचा आढळ

– उशिराचा करपा, केवडा, सिट्रस गमोसिस आणि तुडतुड्याची शक्यता वाढते. डाळींबामध्ये जीवाणूजन्य रोग आणि तेलकट डाग दिसतात. केळीच्या पिकामध्ये जिवाणूजन्य मर होऊ शकते.

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– आले,हळद,पपई आणि केळी पिकांसाठी चांगली

81% पेक्षा जास्त, खूप आर्द्रता

– रोगाचा आढळ

– बोट्रायटीस मोल्ड्स, उशिराचा करपा, केवडा आणि तुडतुड्याची शक्यता वाढते.

– रोपांची वाढ आणि फुलोऱ्यावर परीणाम

– हिवाळ्यात खूप जास्त आर्द्रता असते तेव्हा बहुतेक सर्व रब्बी पिकांचे खूप नुकसान होते कारण त्या पिकांना आर्द्रतेची सवय नसते.

महत्वाच्या बातम्या : –

जमिनीची धूप कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर

पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्‍यांची घेऊ काळजी!

‘या’ खतांच्या जोड्या कधीही एकमेकात मिसळू नये अन्यथा होऊ शकते नुकसान 

गटशेती- समृद्धीचा मार्ग, गटशेती म्हणजे काय? जाणून घ्या

‘शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी पैसा, दारू पुरवा’

 

Leave a comment