माती परीक्षणाचा नेमका उद्देश काय ? वाचा सविस्तर

0

१) माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचा उलगडा होतो.

२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पिकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट, हिरवळीचे खत, गांडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत याचा अभ्यास करता येतो.

३) सामू PH, विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3, सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस (आयर्न)Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg, सल्फर S, सोडियम Na घटक द्रव्यांचे मातीतील प्रमाण ओळखण्यासाठी माती परीक्षण केले जाते.

४) पीक वाढीसाठी जमीन चांगली आहे किंवा नाही ते समजते. जमिनीचा कस लक्षात येतो.

५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो. त्यामुळे त्यावर उपाय योजना करणे सोपे जाते.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या अश्वगंधाचे अद्भुत फायदे जे कदाचित तुम्हीला माहिती असेल

भारतीय खाद्य महामंडळामध्ये 89 रिक्त पदांची भरती

चांगली बातमीः ‘या’ पिकांची खरेदी एमएसपीवर सुरू

शेतकऱ्यांनो मार्चमध्ये करा ‘या’ पिकांची लागवड आणि मिळवा दुप्पट नफा..!

17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

 

Leave a comment