कलिंगड लागवड पद्धत 

0

कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो.

अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.

कलिंगड हे पीक पूर्वी नदीकाठच्या भागामध्येच पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यावर तेथे जानेवारीमध्ये लागवड केली जात असे. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्टीने लागवडीसाठी घेतली जाते. हवा, पाणी पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे वेलींची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात अकाली येणाऱ्या ढगाळ हवेमुळे या लोकांची झोप उडत असे. एप्रिल, मे च्या पावसात पीक सापडल्यामुळे आलेला माल वाहून जात असे. या परिस्थितीमुळे या भागातील लोकांना प्रचंड नुकसानीस गेले चाळीस – पन्नास वर्षापासून तोंड द्यावे लागत होते.

मागील वीस वर्षापासून – लागवडीपासून व्यवस्थित काळजी घेतल्यास मिळणारा आर्थिक फायदा पाहून हे पीक पूर्वीसारखे फक्त नदीकाठच्या भागातच न घेता बागायती पीक म्हणून शेतकरी घेऊ लागले आहेत व शहरी मार्केटला (दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर ) पाठवून आखाती राष्ट्रात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ
लागली आहे.

महत्त्व :

उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे.

कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण :

पाणी -९३%, शर्करा पदार्थ – ३.३%, प्रथिने – ०.२%,
तंतुमय पदार्थ – ०.२%, खनिजे – ०.३%, चुना – ०.०१%, स्फुरद –
०.०९%, लोह – ०.००८%, जीवनसत्त्व ‘क’ – ०.००१ मि. ग्रॅ.,
जीवनसत्त्व ‘ब’ -१२ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व ‘ई’ – १ मि. ग्रॅ. असते.

जमीन :

हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. तथापि दशावतार फवारल्याने हे फळावरील डाग थांबलेत. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची,मध्यम – काळ्या ते करड्या ‘रंगाची (‘डी ‘ किंवा ‘जी’ साईल असलेली) पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान :

उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती :

शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.

– शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

– असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे
मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.

– मधु: या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून
फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बऱ्यापैकी होती.

– अर्कामाणिक :
या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.

– मिलन:
लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.

– अमृत :
महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :

सुपर ड्रॅगन :
ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
ही जात मर रोगास (फ्युजरियम) प्रतिकारक आहे.

ऑगस्टा :
ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे.
दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.

शुगर किंग :                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       अतिशय जोमानेवाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजरियम) प्रतिकारक आहे.फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.

बादशाह :
ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे,गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य.

किरण:
कलिंगड लांबट लहान ते मध्यम आकाराचे असल्याने घेणाऱ्यालाही परवडत असल्याने याला वजनावर ८ ते १५ रू. किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. याचा गर लालभडक, मधूर गोड चवीचा असल्याने याला दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे.

नामधारी २९५,२९६,४५० :
या जातींची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेतकरी नवीन व चांगल्या वाणांनी नेहमी मागणी करतात. अशा संकरित जातींनाही आशिर्वाद अर्थप्लस व दशावतार वापरून शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात भरघोस उत्पादन मिळते.

लागवडीचा हंगाम :

लागवड शक्यतो जानेवारी-मार्च महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो. लागवडीचा हंगाम कोणताही असला तरीही त्यास आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार वापरल्यास प्रतिकूल हवामानात देखील वाढ चांगली झाल्याने अधिक उत्पादन मिळते. त्याचबरोबर दर्जाही सुधारतो त्यामुळे भावदेखील चांगला मिळतो.

लागवड :

लागवड सरी पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड करावी. दोन मीटर अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस दोन फुटावर लहान लहान आळी तयार करावी. एका आळ्यामध्ये एकच बी लावावे. पाणी कमी असल्यास १० -१० फुट अंतरावर सरी काढून ४ -४ फुटावर लागवड करावी. थंडीमध्ये बियांची उगवण कमी होते. वाढ लवकर होत नाही.

यासाठी कोमट पाण्यामध्ये ‘आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार’ ची प्रक्रिया करावी. यासाठी “२५० ग्रॅम बियासाठी २५० मिली गरम पाण्यात अगोदर बी भिजवूननंतर 50 मिली अर्थप्लस व 50मिलि दशावतार टाकावे. बियाणे जास्त असल्यास १ किलोपर्यंत १ लि. पाणी वरीलप्रमाणे घेऊन आशिर्वाद अर्थप्लस 250मिलि व आशिर्वाद दशावतार 250मिली वापरावे अशा द्रावणात ३ ते ४ तास बी भिजवून सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर व निरोगी होते. मर होत नाही.

पीक संरक्षण :

(कीड व रोग)
आशिर्वाद दशावतार लागवडीनंतर एकरी 5लिटर सोडून 3-4 दिवसांनी अर्थप्लस 10लिटर एकरी ड्रिपने महिण्यातुन एकदा व दशावतार ची 8-10दिवसाला फवारणी केल्याने पिक जोमदार व निरोगी राहते, प्रतिकार शक्ती वाढते,फुळगळ थांबते, फळ सेटींग चांगली होते. फळ वजनदार व फळांची साईज वाढते.

कीड :
नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी
किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. या किडींना प्रतिबंधक आशिर्वाद दशावतार ची नियमीत फवारणी करावी.

१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
आशिर्वाद दशावतार ची 8-10दिवसाला फवारणी करावी.

२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात. आशिर्वाद दशावतार ची 8-10दिवसाला फवारणी करावी.

३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात सुरुवात होते. आशिर्वाद दशावतार ची 8-10 दिवसाला फवारणी करावी.

रोग :
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात. आशिर्वाद दशावतार ची 8-10दिवसाला फवारणी करावी.

२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात. आशिर्वाद दशावतार ची 8-10दिवसाला फवारणी करावी.

३) मर : बुरशीजन्य रोग असून वेळी संपूर्ण जळून जातात. यासाठी आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार या औषधांचा वापर बीजप्रक्रियेसाठी केल्यास मर होत नाही.
आशीर्वाद दशावतार लागवडी नंतर आळवणी करावी.
वरील रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी आशिर्वादन्युट्रिप्लांटफुड,
आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार वापरावे.

आशिर्वादची औषधे वापरण्याची पद्धत

1) आशिर्वाद अर्थप्लस व आशिर्वाद दशावतार 50ते 100मिलि/१ लिटर पाणी
बियांण १५ ते ३० मि. बुडवून ठेवणे

2) आशिर्वाद दशावतार 5लीटर/एकर लागवडीनंतर लगेच व आशिर्वाद अर्थप्लस 10लिटर ( लागवडी नंतर 2-3 दिवसानी)

3) आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर + आशिर्वाद न्युट्रिप्लांटफुड 2लिटर
( २० ते २५ दिवसानी)

4) आशिर्वाद प्लांट न्युट्रिफुड 2लिटर
( 35 ते 40 दिवसानी)

5) अर्थप्लस 10लिटर + आशिर्वाद न्युट्रिप्लांटफुड 2लिटर
( 50 ते 55 दिवसानी)

6)अर्थप्लस 10लिटर + आशिर्वाद न्युट्रिप्लांटफुड
( 60 ते 65 दिवसानी)
टीप =ड्रिप/पाठपाण्यातून देणे.

आशिर्वाद दशावतार 2लिटर – २०० लीटर पाण्यात मिसळून फवारण्या घ्याव्यात.
मार्गदर्शन/प्रायोगिक तत्वावर दिली आहे. उत्पादनाचा प्रत्यक्ष वापर, हवामानातील बदल, जमिनीचा पोत, पाण्याचा पीएच/क्षार व इतर घटकामुळे रिजल्ट कमी-जास्त प्रमाणात येऊशकतात.

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.

२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.

३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट-पिवळसर रंगाचा दिसतो.

उत्पादन :

साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.

विक्रम घोलप
7020845477

महत्वाच्या बातम्या : –

कोथिंबीर लागवड पद्धत

आंब्याच्या पहिल्या पेटीची किंमत 3,000 रुपये

मिरची लागवड मार्गदर्शन

पेरू लागवड पद्धत

लवकरच सुमारे अडीच कोटी सातबाऱ्याचे होणार डिजिटलायझेशन

Leave a comment