नैसर्गिक खत आणि सेंद्रीय शेती साठी वापरा गांडूळ खत
असे तयार करा खात
जे वाळलेला पालापाचोळा, कुटार,कडबा,शेणखत,शेतातील हिरवे गवत, तण, झाडांचे व पिकांचे कुजलेले/वाळलेले अवशेष इ. नैसर्गिक पदार्थ यांपासून गांडुळ खत बनविलेले आहे.
तसेच फायदा म्हणजे ह्या खताचा अर्क/सार म्हणजे वर्मी वॉश नाव ऐकलं असेल त्यालाच ह्युमस किंवा ह्युमिक ऍसिड सुद्धा म्हणतात जे पिकांवर फवारणी करता येते व मुळांना टाकता येते ज्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते व पिकाची क्वालिटी बदलते
गांडूळ खतांत असणारे महत्त्वाचे घटक –
१) गांडूळखतामध्ये मोनोसॅकॅराईडस, डायसॅकॅराईडस व पॉलीसॅकॅराईडस ही पिष्टमय पदार्थ, अमिनोआम्ल व साधी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लिग्नीन, न्युक्लीक ऑम्ल व ह्युमस ही कार्बनी रसायन जास्त प्रमाणात असतात.
२) गांडूळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण ४० ते ५० %असते. ह्युमसमध्ये ४० ते ५७%कार्बन, ४ ते ८%हायड्रोजन, ३३ ते ५४%ऑक्सिजन, ०.७ ते ५ %सल्फर व २ ते ५%नत्र असते.
३) गांडुळखतामध्ये १.८ %नत्र, ५७%स्फुरद, १.०%पालाश तसेच मँगनीज, झींक, कॉपर, मंगल, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात.
शारीरिक फायदे:-
रासायनिक खतांच्या वापरामुळे आम्हाला खालील रोग मिळालं कॅन्सर,डायबिटीस, ब्लडप्रेशर, ट्युमर, हार्ट प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम,कमी वयात हार्मोन्स ची वाढ आता तरी विचार करा
शरद केशवराव बोंडे (जैविक कास्तकार) ९४०४०७५६२८