फळाचे सालही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात

0

फळे खाल्याने आरोग्याला मोठा फायदा होत असतो. पण फळाच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. केळीसोबतच आपण संत्री आणि मोसंबीची साल फेकून देत असतो, पण हे चुकीचे आहे.

देशांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या शोधामध्ये आढळून आले आहे की, फळांच्या सालींमध्ये डिप्रेशन आणि इतर आजारापासून वाचविण्याचे गुण असतात. आपल्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी सालींची महत्वाची भूमिका आहे.

बटाटे- पचन व्यवस्थेतील दोष करते दूर

बटाट्याची साल हे झिंक, आयर्न, विटामिन सी, पोटॅशियम इत्यादीचा मुख्य स्त्रोत आहे. या सालीचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच पचन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी होतो. त्वचा चमकदार तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतात ते दूर करण्यासाठी या बटाट्याच्या सालीचा उपयोग होतं.

पोट आणि यकृतासंबंधी रोग

नाशपातीच्या सालीत विटामिन सी तसेच फायबर आणि ब्रोमलेन याचा प्रचंड स्त्रोत होत आहे. तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवून पोटातील मृत उतीना शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो.

लसूण- हृदय रोग, स्ट्रोक

लसणाच्या सालींमध्ये फिनायल प्रोपेनॉईड नावाचे ऑंटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. रक्तदाब सोबतच शरीरातील कोलेस्ट्रोलचा थर कमी करण्याचा काम करतो. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

केळी

केळीच्या सालीमध्ये फीलगुड हार्मोन सेरोटोनिन मुबलक प्रमाणात आहे . त्यामुळे नैराश्य, उदासी इत्यादीपासून मुक्ती मिळते. तसा केळीच्या सालीमध्ये लुटीन नावाचे अँटिऑक्सिडंट सुद्धा सापडते. हे अँन्टिऑक्सिडंट डोळ्यांमध्ये असलेल्या कोशिकांचे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून बचाव करून मोतीबिंदूपासून सुरक्षा करते.

संत्रा आणि मोसंबी

संत्रा आणि मोसंबीच्या सालीमध्ये सुपर फ्लावोनोईड उपलब्ध असते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे थर कमी करण्याचे काम करतो. तसेच अँटिऑक्सिडंट, तसेच रक्तप्रवाह सुरु असताना धमन्यांवर दबाव पडत नाही. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

महत्वाच्या बातम्या : –

लाल सफरचंद किंवा हिरवे सफरचंद, आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे?

२०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष

राज्यातील किमान तापमानात चढउतार

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ

रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात

 

Leave a comment