कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन
कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने चक्क लाल भेंडी चे संशोधन केले आहे. वेंगुर्ला येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभू आजगावकर असे त्यांचे नाव आहे. मागील 14 वर्षांपासून लाल भेंडीच्या वाणाचे संशोधन करीत होते. 6 वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे स्वामित्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.अखेर या लाल भेंडीच्या संशोधनाला केंद्र शासनाने स्वामित्व प्रमाणपत्र दिले आहे.
अनंत यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या विषयात पदविका घेतली आहे. पदविका घेतल्यावर त्यांनी शेतीकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी आपल्या शेतात पांढऱ्या भेंडीचे पीक घेतले त्यांना या पांढऱ्या भेंडीत काही भेंडीवर लाल-गुलाबी छटा आढळल्या व त्यांनी ते लक्षात घेऊन लाल-गुलाबी छटा असलेल्या भेंडीच्या बियाण्यातूनच नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. या पद्धतीचा वापर करून या लाल भेंडीची जात विकसित करून २५ किलो बियाणे तयार केले आहे.
या लाल भेंडी ची वैशिष्ट्ये जाणून घ्या
भेंडीचा रंग लाल आणि लांबी सात ते आठ इंच असून भेंडीमध्ये चिकटपणा कमी असल्यामुळे व भेंडीच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारपेठेत भेंडीला मोठी मागणी आहे.पिकाचा कालावधी १२० ते १३० दिवसांचा असून पिकाची काढणी ४० ते ५० दिवसांनी होते. प्रत्येकी झाडापासून एक ते दीड किलो उत्पन्न मिळते.शिवाय या भेंडीत औषधी गुणधर्मही आहेत.
महत्वाच्या बातम्या : –
शिंगाड्याचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहे काय ?
करडांना होणारे सर्वसाधारण आजार, लक्षणे व त्यावरील उपाय
कोंबडी आणि बदके वगळता २८० अंडी देणाऱ्या ‘या’ पक्षीचे पालन करा, मिळेल कमी किंमतीत अधिक नफा
सामान्य दिसणारी ब्राह्मी आहे खूप खास, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
गावातल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवत शेतकरी कमवत आहे चांगले उत्पन्न