औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाज्यचे दर स्थिर

0

औरंगाबाद  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक ३७ क्विंटल, तर सरासरी दर ३२५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. १११ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ४५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ७५ क्विंटल तर सरासरी दर २००० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ११९७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

वांग्याची आवक २९ क्विंटल, तर सरासरी दर ५५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या गवारला सरासरी २५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळालाबटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. या बटाट्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. बटाट्याचा सरासरी दर ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला

पत्ताकोबीची आवक ५६ क्विंटल, तर सरासरी दर २७५ रुपये प्रति क्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. आवक ३८ क्विंटल तर सरासरी दर १२०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मेथीची आवक १४,५०० जुड्या झाली. या मेथीला सरासरी २५० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. ८६०० जुड्यांची आवक झालेल्या पालकला सरासरी १९० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला.

कैरीची आवक १२ क्विंटल, तर सरासरी दर ८००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ क्विंटल आवक झालेल्या पपईला सरासरी ४७५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.कोथिंबिरीची आवक ११३०० जुड्या, तर सरासरी दर १०० रुपये प्रति शेकडा राहिले. १० क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

टरबुजाची आवक १३० क्विंटल, तर सरासरी दर ६५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३७ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाला सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. द्राक्षाची ७७ क्विंटल आवक झाली. या द्राक्षाला सरासरी ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. १३ क्विंटल आवक झालेल्या रामफळाचे सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. चिकूची आवक २५ क्विंटल, तर सरासरी दर १००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या अंजिराला सरासरी ४००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.मोसंबीची आवक ७ क्विंटल, तर सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्याने उजाड माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग

नरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण; उजनीचे पाणी भोगावती नदीत आले

लाल कांदा हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करतो, त्याचे फायदे जाणून घ्या

मुर्रा म्हशीची ओळख कशी करता येणार, दुग्ध उत्पादन क्षमता व किंमत काय याची संपूर्ण माहिती

म्हशीच्या ‘या’ 4 जाती सर्वात जास्त दूध देऊ शकतात, वाचा संपूर्ण लेख

 

Leave a comment