युरिया बाबत अन्य लक्षात घेण्याजोगी बाबी

0

– युरीयात ४६ % नत्र असले तरी त्याची उपयोग कार्यक्षमता ( use efficiency) खूपच कमी असते, या हिशोबाने प्रत्यक्ष उपयोगी पडणारा नत्र प्रति किलो भासतो त्यापेक्षा महागच पडतो,

– देशभरात खप होत असलेल्या रा. खतांपैकी युरीयाचा हिस्सा ५० % अधिक आहे, त्यामुळे देशभरात नत्र : स्फुरद पालाश वापराचे गुणोत्तर गेल्या अनेक वर्षांपासून ७ : ३: १ असे विषम आहे, जे ४: २: १ आदर्श मानले जाते,

– या विषम N : P : K गुणोत्तरामुळे पिकात अन्नद्रव्यांच्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम होऊ शकतो ,

– अजूनही मोठ्या प्रमाणात युरीया पिकात फेकून आणि पिक अवस्थेचा विचार न करता वापरला जातो,

– कोणत्याही पिकाची अशी कोणतीच अवस्था नसते ज्यावेळी फक्त नत्राचीच गरज असते, म्हणून युरीया शक्यतो अन्य घटकयुक्त खतासोबत वापरणे हितावह,

– युरीया व्यतिरिक्त शेणखत, कंपोष्ट, अमो. सल्फेट, संयुक्त खते, विद्राव्य खते अशा माध्यमातून ही नत्राची पूर्तता होत असते, हे युरीयाची मात्रा ठरवतांना विचारात घ्यावे.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या वटवृक्षाचे औषधी आणि गुणकारी महत्व

महापंचायतीस लाखो शेतकऱ्यांची गर्दी

लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय,शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

कार्ली व दोडका लागवड मार्गदर्शन

Leave a comment