नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक १०३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिले.
बटाट्याची आवक २५९० क्विंटल झाली. त्यास ११०० ते १८५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. लसणाची आवक १० क्विंटल झाली. त्यास ३००० ते ९४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७०० राहिला.वांग्याची आवक १५४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ७००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ४००० राहिला. फ्लॉवरची आवक ११४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १११० दर मिळाला. त्यास सरासरी दर ८६० राहिला.
काकडीची आवक ५०० क्विंटल झाली. तिला १५०० ते ३२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. कोबीची आवक १०९६ क्विंटल झाली. तिला १६५ ते २९० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २१५ राहिले.कारल्याची आवक ५७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१५ ते ४५८५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० रुपये राहिले.
लाल पोळ कांद्याची आवक १३६० क्विंटल झाली. त्यास ८२५ ते ३५५० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर २४०० राहिला. गिलक्याची आवक १९ क्विंटल झाली. त्यास २५०५ ते ३९६० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३५ राहिला. भेंडीची आवक ४२ क्विंटल झाली. त्यास १६६० ते ३३३० दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. भोपळ्याची आवक ८३८ क्विंटल झाली. त्यास ४६५ ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३३५ राहिला. दोडक्याची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ४१६५ ते ५००० असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ४५८५ राहिला.
फळांमध्ये संत्रीची आवक ९५ क्विंटल झाली. तिला २००० ते ३५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. लिंबूची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ७५० ते १७५० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. डाळिंबाची आवक २६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ८००० राहिला. बोरांची आवक १२५ क्विंटल झाली. त्यास ७०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० राहिला.
महत्वाच्या बातम्या : –
अहमदनगरमध्ये कांद्याला मिळाला 3000 ते 3400 रुपये भाव
उन्हाळी मुगाचे उत्पादन तंत्रज्ञान
महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध