गांडूळ अर्क वापरण्याची पद्धत व फायदे

0

गांडूळखताप्रमाणेच गांडूळ अर्कही उत्तम पीकवर्धक मानला जातो. त्यामध्ये घुलणशिल स्वरूपातील मुख्य अन्नद्रव्यासह दुय्यम व सूक्ष्म मूलद्रव्ये असून, ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. परिणामी पिकांची प्रतिकारक्षमता वाढून उत्पादनाला चालना मिळते.

त्याच बरोबर विटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स, हार्मोन्स, ह्युमिक ऍसिड, फॉलिक ऍसिड, फुलविक ऍसिड, अमिनो ऍसिड, ऑंटी एक्सीडेंट, ऍसिटिक ऍसिड, जिब्रेलिक एसिड, हीटरोत्रोफिक बॅक्टरिया, ऑंटीनोमीसाइट्स, फंगीसाइड हे घटक सेंद्रिय स्वरूपा मध्ये उपलब्ध असतात.

तसेच सर्व प्रकारचे जिवाणू मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात..”गांडूळ अर्क” सेंद्रिय शेती कडे वाटचाल करत असणाऱ्या शेतकऱ्याच्या साठी वरदान ठरत आहे.

गांडूळखत अर्क वापरण्याची पद्धत

प्रती एकर पीक फूल – फळावर आल्यावर १० दिवसांच्या अंतराने व्हर्मिवॅाश (प्रमाण 200 लिटर पाण्यात 10 ली.) फवारण्या कराव्यात .

तसेच व्हर्मिवॅाश मध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच पिकासाठी उपयुक्त जिवाणू असल्यामुळे याचा आळवणीसाठी हि फार चांगला उपयोग होतो.

प्रती एकर 20 लिटर व्हर्मिवॅाश दोनशे लिटर पाण्यामधून 15 दिवसांच्या अंतराने सोडावे.

“वेस्ट डीकंपोजर” प्रमाणे 200 लिटर द्रावणा मधील 20 लिटर द्रावण विरजण म्हणून आपण कितीही वेळा वापरू शकतो..

वरील “वर्मी वॉश” मध्ये आपण “वेस्ट डीकंपोजर” मधील सर्व जिवाणू अधिक केलेले आहेत.

फायदे

पीकवाढीसाठी आवश्यक घटक गांडुळांच्या त्वचेमध्ये, विष्ठेमध्ये आहेत. त्यातून मिळणारे व्हर्मिवॅाश पिकांसाठी सर्वोत्तम पीकवर्धक आहे.

व्हर्मिवॅाश फुलोरा व फळ पक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ, फळगळ थांबते.

पीक जोमदार वाढते. पिके रसरशीत दिसतात.

कीड व रोगास प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

उत्पादनात निश्चित वाढ होते.

व्हर्मिवॅाश सावलीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पिकावर फवारावे व जमिनी मध्ये आळवणी करावी.

महत्वाच्या बातम्या : –

मधमाशी पालन एक शेतीपूरक व्यवसाय, सरकार देतयं भरघोस अनुदान; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

अण्णांची मनधरणी करण्यास फडणवीसांना यश, उपोषणातून माघार

घेवडा लागवड पद्धत

कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार

 

Leave a comment