गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार

0

१ ली पाणी + १ तंबाखु पुडी एकत्र उकळवून गाळुन घेणे व १५ ली पाण्यात मीसळुन गोठा जनावरे व परीसर ह्यावर फवारणे गोचीड गोमाशा ऊवा जूवा पिसवा त्वचा रोग ह्यावर दिर्घकाळ उपचार मिळतो.

जखम होउन अळी पडणे-
पोटॅशिअम परमॅग्नेट ने जखम धुणे, नखाने खरडुन मृत त्वचा काढणे, जखमेत खाण्याचा चुना भरणे.

कास सुजणे- मस्ट्रायटीस-
१.५ कापुर वड्या रोज पिठाच्या गोळ्यात मिसळुन ३ दिवस देणे
२.गोडेतेल २५०मीली खाण्याचा सोडा २०ग्राम खाण्यात देणे
३. गोडेतेलात हळद मीसळुन कासेला मसाज देणे.

नांगर ओढल्याने खांद्यावर सुज-
गोडेतेल २००मीली
कापुर १० वडी
हळद १०० ग्राम
एकत्र करुन सुजेवर लावणे.

पोटफुगी-
गोडेतेल १ ली खाण्याचा सोडा १०० ग्राम हिंग २० ग्राम एकत्र करुन जनावराला पाजणे.

दूधाळ जनावरांत कॅल्शिअम कमतरता-
रोज पिण्याच्या पाण्यात हरबरा डाळीच्या आकारा एवढा खाण्याचा चूना टाकणे.

पहीलारु गाय दुध काढताना लाथा मारत असल्यास-
गायीची संपुर्ण कास जाड मीठाने चोळावे २ वैळा असे केल्यास गायीच्या लाथा मारणे बंद होते.

गायीचे अ़ंग गर्भाशय बाहेर पडणे-
१० ली पाण्यात ३ किलो साखर मिसळुन त्या द्रावणाने गर्भाशय धुणे ह्यामुळे त्वरीत आकुंचन पावते व आत लोटल्यावर बाहेर पडत नाही.

गायीचा जार पडावा म्हणून-
पिठाच्या गोळ्यात १० अॅनासिन गोळ्या देणे
अर्धा तासात जार पडतो.

वासरांना जास्त दुधामुळे होणारे अतिसार –
१. मिसळ सोबत मिळणारा पाव वासराला खाण्यास देणे
किंवा
२. फळ्यावर लीहिण्याचा १ खडू पावडर करून खाण्यास देणे.

पोटात जंत होणे-
कडुनिंबाचा पाला जनावरा समोर नेणे ज्या जनावरास जंताची बाधा आहे तेच जनावर हा पाला खाते व जंत निर्मुलन करवुन घेते.

दूधाची फॅट वाढण्या करता-
खुराकात मोहरीचे तेल ५० मीली तांदुळाचा भुस्सा १०० ग्राम देणे.

गायीच्या सडाला जर माशा डास चावत असतील तर-                                                                    मोहरीचे तेल लावावे दुध काढुन झाल्यावर.

प्रसुती काळातला थकवा व झिज भरुन काढण्या साठी-
गुळ २ ते ३ किलो
पाणी ४ ते ५ लीटर
हिंग ५० ग्राम
ओवा ५० ग्राम
मिसळुन पाजणे.

विष बाधा खाण्यातुन-
कोळसा जिभेला चोळावा व खाऊ घालावा.

दुध प्रमाण वाढण्या करता-
खसखस 200ग्राम
खोबरे वाटी 2
काळा गुळ १ कि
बेसन पिठ १ कि
गोडे तेल २ कि
हे एकत्र करुन ३ दिवस सम प्रमाणात खाण्यास देणे.

दुध प्रमाण वाढण्या करता-
बेसन पिठाचा बुंधीचा लाडु ३ दिवस 5 लाडु ह्या प्रमाणात खाण्यास देणे.

फॅट वाढण्या करता –
हिरवा हरबरा धुतल्या नंतर २५० ब् खुराकातुन खाण्यात वापरणे असे सलग ७ दिवस करणे.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

Leave a comment