अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान
धामणगाव व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा असच कायम होता.
चिखलदरा येथे गुरुवारी दुपारी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या बिच्छूखेडा, खंडुखेडा आणि भुत्रम येथे गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. भुत्रुम या गावात गुरुवारी दुपारी २.१५ च्या सुमारास वीज पडून बैल दगावल्याची माहिती समोर आली आहे.
नांदगाव तालुक्यात कनी मिझार्पूर, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापुर व परिसरातील गावात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. काही गावात तुरळक प्रमाणात गार पडली. हरभरा कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
शेंदूरजनाघाट परिसरात गुरुवार दुपारी ३ वाजता गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे गहू, चणा, एरंडी या पिकांसह संत्रापिकाचे नुकसान झाले.
चांदूर रेल्वे येथे पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना पाऊस व वातावरणापासून धोका निर्माण झाला आहे.
धामणगाव रेल्वे येथे तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकाला अवकाळीचा फटका बसला आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळीमुळे सोंगणी केलेला एक हजार हेक्टरातील हरभरा जमीनदोस्त झाला तर तीनशे हेक्टरातील गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या : –
शेतकऱ्यांना दिलासा, ‘या’ योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान
राज्यात रुग्णवाढीने चिंता, गेल्या २४ तासात ५,४२७ रुग्णांची वाढ