“#IndiaTogether आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नका”, शेतकरी आंदोलनावर क्रिकेटर्सचे ट्विट्स

0

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या विविध सीमेवर गेल्या अनेक महिन्यांहूनही शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता या शेतकरी आंदोलनाला परदेशी कलाकारांनी पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर आता मनोरंजन क्षेत्रा बरोबरच क्रिकेट क्षेत्रामधून अनेक क्रिकेटपटूंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे.

सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे.

सचिन तेंडुलकर यासंदर्भात म्हणाले , “भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

“मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं विराट कोहलीने म्हटलं आहे.तसेच त्याने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया. तसेच त्याने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

 

Leave a comment