शेतीसाठी फायद्याचे माइक्रो ऑर्गेनिज्म

0

ट्रायकोडर्मा – एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी , डाऊनि ,जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

स्युडोमनास – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , भुरी , डाऊनि , जमिनीतून येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

अँपिलोमयसिंन -एक बुरशी जी इतर बुरशीना खाते , उपयोग करपा , भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

बॅसिलस सबटीलस – एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो , उपयोग करपा , डाऊनि , सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशी करिता उत्तम .

बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस – एक जिवाणू जो अळी वर जगतो , आणि अळी चा नायनाट करतो

ब्युव्हेरिया ब्रासीना – एक बुरशी जी रस शोषक किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग मावा , तुडतूडे , मिली बग , करिता उत्तम .

मेटारायझम अनिसपोली – एक बुरशी जी अळी वर्गीय किडीवर जगते , आणि त्यांना मारते उपयोग सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी .

वेस्टडीकम्पोजर – तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात बहुउपयोगी .

PSB – जिवाणू जे स्फुरद उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

KMB – जिवाणू जे पालाश उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.

शरद केशवराव बोंडे                                                                                                                        (जैविक कास्तकार)
९४०४०७५६२८

Leave a comment