२०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष

0

२०१६ बरोबरच २०२० इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. ‘नासा’ ने २०२० हे सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे म्हटले आहे. तर कोपर्निकस नुसार मागचे वर्ष दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष होते. या पूर्वी २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले होते. आता या स्थानावर २०१६ आणि २०२० या दोन वर्षांची नोंद केली गेली आहे.

त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडचे सरासरी तापमान बघता गेल्या वर्षीचे तापमान १.२ ते १.३ अंश सेल्सिअसने वाढले होते. आर्क्टिक महासागरासहित हिंद महासागराच्या मध्य भागात तापमान झपाट्याने वाढत असून ते पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानांपैकी एक असल्याचे उपग्रह चित्रांवरून स्पष्ट होते. हिमालयासह जगातील इतर ठिकाणच्या हिमनद्यांच्या वितळण्याची गतीही वाढली आहे. समुद्राची पातळीही विक्रमीरित्या वाढली आहे. २०१९-२० मध्ये

महासागरांच्या तापमानातही लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ही वाढ उपग्रहांनीही टिपली आहे. विविध संस्थांकडून उपलब्ध माहितीचा विचार केल्यास भूपृष्ठ तापमानासाठी २०२० हे एकतर आजवरचे सर्वाधिक उष्ण किंवा दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरते.

महत्वाच्या बातम्या : –

राज्यातील किमान तापमानात चढउतार

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ

रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात

… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही – शरद पवार

Leave a comment