अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू बागांना फटका

0

अतिवृष्टीच्या तडाख्यात सावरत असलेल्या राज्यातील शेतकऱ्य़ांना अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. कांदा, हरभरा, मका, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका कोकणात आंबा व काजूच्या बागांना बसण्याची शक्यता आहे.

सलग दोन दिवस रत्नागिरी, संगमेश्‍वरसह राजापूर, लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा थेट परिणाम आता आंबा आणि काजू पिकावर होणार आहे. संगमेश्‍वर परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते.

ढगाळ हवामानामुळे आंब्यावर तुडतुडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राज्याच्या कृषी विभागातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता असल्याने राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्य़ांसाठी अलर्ट जारी केला आहे.

गुरुवारी दुपारी २ वाजल्यानंतर ठरावीक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते.

बुरंबी, सोनवडे, लोवले येथे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. देवरूख परिसरात ढगाळ वातावरण असूनही पाऊस नव्हता. देवरूख येथे सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होते. जोडीला पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका आंबा आणि काजू पिकाला बसणार आहे.

दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला होता. ]गेल्या २४ तासात दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत होते.  दुपारी ३ वाजल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, विल्ये, पोचरी या भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास पावसाचा शिडकावा सुरूच होता. तर पुण्यात सुद्धा अनेक भागात पावसाची रिमझिम बघायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या : –

जेव्हा मुख्यमंत्री आपला ताफा अचानक थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात

शेतकऱ्यांशी बैठक ‘निष्फळ’ ठरल्यानंतर राहुल गांधी संतापले

लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, राजेश टोपेंनी दिली माहिती

नैसर्गिक खत आणि सेंद्रीय शेती साठी वापरा गांडूळ खत

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी

Leave a comment