कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.
मागील जवळपास 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास विकास आघाडीतील नेत्यांनी देखील कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध येत्या आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत, असे मलिक म्हणाले.
कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असेही ते म्हणाले. सोबतच, आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याच्या विचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी होकार दिला आहे. आठवडाभरात हा मोर्चा काढण्याचे नियोजन असून एक-दोन दिवसांत त्याच्या तपशिलाबाबत अंतिम निर्णय होईल. कोरोनाविषयक नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या : –
गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार
अश्या प्रकारे करा लेमन ग्रासची शेती
पीक विमा कंपन्यांनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची १२९ ते ३८७ क्विंटल आवक