हळदीला उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा भाव

0

वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकत्याच झालेल्या हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाला.

हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते. मात्र, या वर्षी हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव व पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वर्षी  ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद आहे, परंतु हळदीवर कंदकजव्यासह करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला सरासरी सात ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. जवळाबाजार येथेसुद्धा काही प्रमाणात हळद विक्रीला येते. वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ५ हजार पोत्यांची आवक झाली. दर्जेदार हळदीच्या मालास १० हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्याने खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर

भुईमुग पिक संरक्षण

पिकांचे रोग म्हणजे काय ? जाणून घ्या

जमिनीची धूप कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर

पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्‍यांची घेऊ काळजी!

 

Leave a comment