टोमॅटो मार्गदर्शन

0

लागवडीचा हंगाम व जमीन

खरीप जून-जुलै ,

रब्बी सप्टेंबर-ऑक्टोबर ,

उन्हाळी डिसेंबर-जानेवारी.

टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.

लागवडीसाठी सुधारित वाण

पुसा गौरव ,रोमा ,अर्का विकास,फुले राजा ,पुसा रुबी,पंजाब केसरी, नामधारी २५३५.अभिनव,अविनाश,आयुष्यमान  २ ,रुपाली ,वैशाली ,इ लोकल कंपनी चे वाण बाजारपेठेत उपलब्ध आहेत (आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार जातीची निवड करावी )

एकरी बियाणे १०० ते १२० ग्राम

लागवडीसाठी अंतर खरीप व रब्बी ९० बाय ६० सेमी उन्हाळी ६० बाय ४५ सेमी.

खत व्यवस्थापन व रोग किडी व्यवस्थापन

पूर्वमशागत करताना जमिनीत १२ ते १४ गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे .

गादीवाफे/बेड तयार करताना त्यामध्ये आशिर्वाद भुसम्राट सेंद्रिय खत 2टन +निंबोळी खत २०० किलो एकरी द्यावे.

गादीवाफा/बेड ओला करून घ्यावा. रोप लागवड वापसा अवस्थेत करावी रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी व ठिबकमधून आशिर्वाद दशावतार एकरी 5लिटर द्यावे.

३ दिवसानी ठिबकमधून आशिर्वाद अर्थप्लस द्यावे.

५ व्या दिवशी ठिबकमधून सप्तधान्य स्लरी द्यावी.

आशिर्वाद न्युट्रीप्लांटफुड ठिबकमधून  २लिटर ३ दिवसाच्या अंतराने ८ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी लागवडीपासून ५ ते ३० दिवस )

७ व्या दिवशी फवारणी आशिर्वाद दशावतार १५०मिली + एम ४५- ३० ग्राम + असाटाफ ३० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

१० व्या दिवशी पिवळे चिकट सापळे ५ व निळे चिकट सापळे ५ लावावे चिकट सापळे यावर असलेल्या किडीचा प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.

पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भाव नुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून पालटून फवारणी घ्यावी.रसशोषक  किडींसाठी इमिडेक्लोप्रीड फवारावे.फळपोखरणारी अळी प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ एस सी (Tracer) ७ मिलि किंवा सायंट्रेनिलिप्रोल १०.२६% ओ.डी.(Benevia) १५ मिलि किंवा अलिका १० मिली १५ लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. केवडा, भुरी ,मर या बुरशीजन्य रोगांसाठी साफ किंवा अवतार किंवा एम ४५   फवारावे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवशकतेनुसार फवारावे.

१५ व्या दिवशी सिलिकॉन ३० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

३० ते ३५ दिवसादरम्यान झाडाला वळण व आधार देणे.

आशिर्वाद न्युट्रीप्लांटफुड ठिबकमधून २लिटर ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे..(देण्याचा कालावधी ३१ ते ५० दिवस )

३० व्या दिवशी आशिर्वाद अर्थप्लस १०लिटल ठिबकमधून द्यावे.

३५ व्या दिवशी आशिर्वाद दशावतार १५०मिली + टाटा बहार ३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने २ वेळेस द्यावे.

४५ व्या दिवशी ठिबकमधून  मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो.

आशिर्वाद न्युट्रीप्लांटफुड  २लिटर ३ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस द्यावे (देण्याचा कालावधी ५० ते ७० दिवस )

५० व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो ठिबक मधून द्यावे त्यानंतर २ दिवसांनी बोरॉन १५ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

६० ते ६५ व्या दिवशी आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर ठिबकमधून द्यावे

पुढील तोडणीला आशिर्वाद न्युट्रीप्लांटफुड २लिटर ३दिवसाला चालू ठेवावी.

उत्पादन

जातीपरत्वे एकरी सरासरी उत्पादन ३० ते ४५ क्विंटल येते तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस आधी कीटकनाशक फवारणी करू नये ,६५ ते ७० दिवसांनी तोडणी सुरु होते.तोडणी दिवसाआड करावी.

विक्रम घोलप                                                                                                                 7020845477

Leave a comment