न्यायालयाने शेतकरी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मोठा दणका दिला आहे. कायद्यांना स्थगिती देण्यासोबतच न्यायालयाने 4 सदस्यीय समिती नेमली आहे. मात्र समितीमधील चारही सदस्य कृषी कायद्याच्या बाजूने असल्याचा आरोप केला जात आहे.
ही कमिटी आंदोलन थांबविण्यासाठी केलेला फक्त एक फार्स ठरू नये, अशी अपेक्षा काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी लढाई अजून संपलेली नाही, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
कमिटीने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून या निर्दयी मोदी सरकारला हे काळे कायदे रद्द करायला लावावेत.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 12, 2021
सर्वाच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर याबाबत ट्विट करत सतेज पाटील म्हणाले की, तीन कृषी कायद्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या या चार सदस्यांचा समावेश असणारी ही कमिटी आंदोलन थांबविण्यासाठी केलेला फक्त एक फार्स ठरू नये.
कमिटीने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून या निर्दयी मोदी सरकारला हे काळे कायदे रद्द करायला लावावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या : –
शेतकऱ्यांना दिलासा; कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
राज्यात हायअॅलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं – राजेश टोपे
अश्या प्रकारे तयार करा दशपर्णी अर्क