अशी करा शेवग्याची लागवड….

0

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेवगा हे पीक चांगले उत्पन्न देणारे आहे. महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्येदेखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून अशा परिस्तिथीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेने कमी आहे.

शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो.परंतु शेवगा लागवडीसाठी जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, या वेळी हवेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते. अशा वेळी रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्यास अनुकूल वेळ असते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा

कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो.

पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्डा भरून घ्यावा. लागवड करताना दोन झाडांतील व ओळींतील अंतर ३ मीटर ठेवावे. शेताच्या बांधावर लागवडीसाठी ३ मीटर अंतर ठेवावे. शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते.

शेवग्याची छाटणी :

लागवडीनंतर साधारणपणे ३ ते ४ महिन्यांनंतर व झाडांची उंची ३ ते ४ फूट झाल्यानंतर वरून अर्धा ते एक फूट शेंडा छाटावा. त्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहून शेंगा देणाऱ्या फांद्या ३ ते ४ फुटाच्या खाली आल्याने शेंगा काढणीस सोपे जाते. लागवडीपासून ६ ते ७ महिन्यात शेंगा तोडणीस येतात. त्यानंतर ३ ते ४ महिने शेंगाचे उत्पादन मिळते. एक पीक झाल्यानंतर पुन्हा झाडांची छाटणी करुन झाडास योग्य तो आकार द्यावा. त्यासाठी झाडाचा मुख्य बुंधा ३ ते ४ फूट ठेवून बाजूच्या फांद्या साधारणतः १ ते २ फूट ठेवाव्यात.

या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही. परंतु, काही वेळा जून ते ऑगस्ट महिन्यात पानांची गळ होते. खोड व फांद्यांवर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोेपे मरतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा बोर्डोमिश्रण (०.२५%) फवारावे.

लागवडीपासून सुमारे ६ ते ७ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागदाच्या गोणपाटात गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. एका वर्षानंतर दरवर्षी एका चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात. करा शेवग्याची लागवड करा शेवग्याची लागवड

Leave a comment