असे बनवावे घरच्या घरीच प्रभावी किड व बुरशी नाशक…
प्लास्टिक बकेट किंवा मातीचा माठ घेऊन त्यात ५लिटर ताक टाकावे. या ताकातच तांब्याचा तार किंवा तुकडा टाकावा. (तांब्याचा तुकडा/तार टाकल्यामुळे ताक अतीशय आंबट बनते व ताकाचा बुरशीनाशकाच्या गुणधर्मात वाढ होते.)
माठाचे तोंड प्लास्टिक पॉलीथीन बांधुन हवाबंद करावे. या माठाला झाडाच्या सावलीत परंतू पावसाचे पाणी लागणार नाही अशा पद्धतीने १५ दिवस न हलवता ठेवावे. (जमिनीत खड्डा करून प्लास्टिक तोंड जमीनीवरच राहिल अशा पद्धतीने सुद्धा माठ सावलीत ठेवता येतो)●१५ दिवसानंतर माठातील ताक गाळून घ्यावे.अतिशय आंबट वास येतो.
त्यानंतर अशा द्रावणाचा उपयोग फळे व भाजी पाला पिकांवर करता येते.
तयार केलेले ‘ताक’ द्रावण फवारावे कसे?
२५०-५०० मीली (पाव ते अर्धा लिटर) द्रावण १५ लिटर पाण्यात वापरावे.
रस शोषक किडी जसे कि मावा, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी इत्यादी रस शोषक किडींचा उत्तम बंदोबस्त केला जातो.
स्पर्शजन्य ताम्रयुक्त बुरशीनाशक म्हणून सुद्धा याचा परिणामकारक उपयोग केला जातो.
गळणारा किंवा ठिबकणारा माठ यासाठी वापरू नका
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
महत्वाच्या बातम्या : –
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला भोवले, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द
थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी
दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन
‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
अमित शहांचा राजीनामा घ्या, काँग्रेसची मागणी