कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप मात्र उडाली आहे.
अचानक वातावरणात झालेले बदल पाहता कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असतानाच आता कारंजामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास दीड ते दोन तास आलेल्या या पावसात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे साडेतीन हाजर क्विंटलपेक्षा अधिक धान्य ओले झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये गहू, चणा, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दुसरीकडे, कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाने संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच शेतात मळणीला आलेला किंवा मळणीकरिता कापून ठेवलेला गहू, चणा मातीमोल झाला आहे. शेतात उभा असलेला गहूही जमिनीवर आडवा झाला आहे. त्यामुळे उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील, अशी पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी दिली होती. तरीही काही शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणला होता. अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
उत्तराखंडनंतर आता ‘या’ राज्यात गांजाची लागवड वैध होऊ शकते, वाचा सविस्तर
जर विक्रेता रेशन देण्यास नकार देत असेल तर या क्रमांकावर कॉल करा, त्वरित कारवाई केली जाईल
उन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचे सेवन करा कोणतीही समस्या उद्भवणार नाही
डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे काय ? जाणून घ्या
उन्हाळी भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, वाचा सविस्तर