पंतप्रधान शेतकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत – जयंत पाटील

0

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप आणि पंतप्रधान फक्त मूठभर भांडवलदारांचा विचार करत असून शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम ते करत असल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. येत्या काळात आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे. म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे त्यामुळे आपण आपले संघटन मजबूत करायला हवे आहे, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महत्वाच्या बातम्या : –

करवंद लागवड पद्धत

शतावरीच्या लागवडीपासून कमवा अधिक नफा

गहू पिकामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी जाणून घ्या

आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात ‘हे’ फायदे

लसूण आणि कांद्यामध्ये आढळणारे मुख्य रोग आणि त्यांचे उपाय

 

Leave a comment