पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

0

पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार निराम झाले असल्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा थेट परिणाम आता राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे बोलेल जात आहे. सध्या हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार होईल. गेल्या २४ तासात निफाड येथे नीचांकी १०.२ अंश सेल्सिअसची सर्वांत किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

मराठवाड्यातही थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील अनेक भागात थंडी आहे. यामुळे किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली होती.

मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. खानदेश व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.

राज्यात पुणे, निफाड, नाशिक, नगर, जळगाव भागात थंडी अधिक आहे. त्यातुलनेत कोकणात किंचित थंडी असून किमान तापमानाचा पारा १८ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम; दोन्ही बाजूंमध्ये आज पुन्हा होणार चर्चा

उन्हाळी बाजरी लागवड

कलिंगड पिक व्यवस्थापन

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर

अहमदनगरमध्ये कांद्याला मिळाला 3000 ते 3400 रुपये भाव

Leave a comment