म्हैशीची आई जिवंत आहे, ती माझ्या घराजवळ बांधलेली आहे दोघांची डीएनए चाचणी करा, शेतकऱ्याची मागणी

0

वरिष्ठ नेते आजम खान यांची म्हैस चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आता शामली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. शामली जिल्ह्यातून एक म्हैस चोरीला गेली होती. आता ती सापडली आहे. मात्र आता या म्हैशीचा मालक कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण दोन शेतकऱ्यांनी म्हैस आपलीच असल्याचा दावा केल्याने हा मोठा प्रहन निर्माण झाला आहे. त्यातल्या एका शेतकऱ्यानं चक्क आता म्हैशीची डीएनए चाचणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

अहमदगढचे रहिवासी चंद्रपाल यांची म्हैस गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या ऑगस्ट महिन्यात चोरीला गेली. दहा दिवसांत तुमची म्हैस शोधून देऊ असं आश्वासन त्यांना पोलिसांनी दिलं होतं. मात्र पोलिसांना म्हैस शोधण्यात अपयश आल्याचं चंद्रपाल यांनी सांगितलं. तर दुसरीकडे सहारनपूर जिल्ह्यातल्या गंगोहमधल्या बिनापूर गावातल्या एका शेतकऱ्याकडे आपली म्हैस असल्याचा दावा त्यांनी केला.

‘म्हैशीची आई जिवंत आहे. ती माझ्या घराजवळ बांधलेली आहे दोघांची डीएनए चाचणी केल्यास सत्य समोर येईल,’ असं शेतकऱ्यानं म्हटलं आहे. यासाठी चंद्रपालनं एसपींना पत्रसुद्धा लिहिलं आहे. या प्रकरणात एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा

नियमित आंबा मोहरासाठी पॅक्‍लोब्युट्रॉझॉल

नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड

कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन

शिंगाड्याचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहे काय ?

Leave a comment