1 कोटी शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत किसान क्रेडिट कार्ड

0

मोदी सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्चाची मर्यादा असलेले अडीच कोटी क्रेडिट कार्ड जारी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अजून 1 कोटी लाभार्थ्यांना केसीसी मिळणार आहे. सरकार पीएम शेतकरी आणि केसीसी लाभार्थ्यांचा गॅप भरु इच्छित आहे. त्यासाठी पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी केसीसी घेणं सोपं केलं आहे. या योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांचं बायोमेट्रिक झालं आहे. त्यांची शेती, बँक आणि आधारचे रेकॉर्ड व्हेरिफाय करण्यासाठी बँक त्यांना केसीसी देण्यात आडकाठी आणू शकत नाही.

देशातील 11.45 कोटी शेतकरी आधार कार्ड, रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि बँक अकाऊंट नंबरचा डेटाबेस केंद्र सरकारला मिळाला आहे.

ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांना या रेकॉर्डला केंद्रीय कृषी मंत्रालया सुरुवातीलाच मान्यता दिली आहे. शेतकरी बँकांना सांगू शकतो की, त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळत आहे आणि त्यांचा प्रत्येक रेकॉर्ड केंद्र आणि राज्य सरकारकडून व्हेरिफाय झाला आहे.

आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी फक्त एक पानी अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज pmkisan.gov.inवर जाऊन डाऊनलोड करावा लागेल. तिथे डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्यायही देण्यात आला आहे. तो फॉर्म तुम्हाला भरुन द्यावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!

चंदन लागवड पद्धत

‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर

‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’

‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’

 

Leave a comment