पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवला जाणार असल्याची माहिती दिली आहे.लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देशात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची कोविशील्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणासंदर्भात कार्यक्रमाची माहिती दिली होती.

लसीकरण प्रक्रिया सुरू होण्याआधी राज्य सरकारं आणि प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटमधून आज कोविशील्ड लसीची पहिली खेप रवाना झाली आहे.

पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. एकूण 8 विमाने कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे.

काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचं काम केलं.”

महत्वाच्या बातम्या : –

देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत २० लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले: आरटीआय

आंध्र प्रदेशातील टोमॅटोच्या शेतकर्‍यांचे 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड

सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव; महाराष्ट्रही झाला सतर्क

Leave a comment