आंब्याच्या पहिल्या पेटीची किंमत 3,000 रुपये

0

हंगामी फळांनी सध्या आपल्यला बाजारपेठा सजल्या असल्याचे दिसून येत आहे. अशात आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामातील पहिला हापूस आंबा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. आंब्याच्या पहिल्या पेटीची किंमत 3,000 रुपये ठेवण्यात आली आहे अशी माहित देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे फळांच्या किंमतीही वाढल्या असल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे यंदा आंबाही महागाचा खावा लागणार आहे. मागच्या वर्षी याच आंब्याच्या पेटीची किंमत 1200 रुपये इतकी होती तीच आता 3000 वर जाणून पोहोचली आहे. आंब्याच्या पहिल्या पेटीची किंमत 3,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यंदा हापूस आंबा हा 15 दिवसांआधीच बाजारात दाखल झाला आहे. हंगामाचा पहिला आंबा हा व्यापारासाठी शुभ मानला जातो. इतकंच नाही तर परंपरेनुसार बाजार समिती प्रशासकाद्वारे आंब्याची पूजादेखील केली जाते.

हापूस आंब्यांचा खरा हंगाम अजून सुरू झालेला नाही. पण तरीदेखील हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांनी आंब्याचा व्यापार वेळीच केला. यामुळे आता 15 दिवस का होईना आंबा प्रेमींना लवकर आंबे खायला मिळणार आहेत. दरम्यान, सर्व सामान्यांच्या खिशाला परवडेल, असा आंबा मिळण्यासाठी अजून 1 महिना तरी ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या : –

मिरची लागवड मार्गदर्शन

पेरू लागवड पद्धत

लवकरच सुमारे अडीच कोटी सातबाऱ्याचे होणार डिजिटलायझेशन

गुच्छी मशरूमला मिळेल जीआय टॅग, त्याचे औषधी गुणधर्म काय आहे ते नक्कीच वाचा

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

Leave a comment