मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले
शेतकऱ्यांचा जत्था मुंबईत दाखल झालं आहे.विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झालेआहे. आज म्हणजेच २५ जानेवारी २०२१ रोजी आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आंदोलक राज्यपालांची भेट घेऊन कृषी कायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत.
आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकरी ‘चलो राजभवन’ म्हणत राजभवनाकडे रावण होणार आहे. किसान मोर्चाचे प्रतिनिधी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कृषिकायद्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात हा मोर्चा आहे.
शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.
“केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असून शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनात शरद पवार देखील सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाची गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या : –
हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का?
‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, आझाद मैदानात झळकवले पोस्टर्स
… म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र