शेतकऱ्याने उजाड माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग

0

द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आढळून येतात पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारु व मनुका तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे हि मधुर रसाची असतात

द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे- नाशिक आणि सांगली आहेत. राज्याच्या 50 टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्‍यांमध्‍ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे.

सातारा जिल्ह्यातल्या फलटण मधल्या कुरवलीचे शेतकरी सचिन सांगळे यांनी त्यांच्या 17 एकर उजाड माळरानात द्राक्ष बाग फुलवली आहे. सध्या या द्राक्षांची तोडणी सुरू आहे.केमिकलची फवारणी केल्याशिवाय द्राक्ष हे पीक येऊ शकत नाही परंतु केमिकल फवारणी करून काही सेंद्रीय निविष्ठा वापरून ती रेसुड्यू फ्री नक्कीच होऊ शकते.

या कारणामुळे या द्राक्षांना देश-विदेशात मोठी प्रमाणात मागणी आहे. या मुरमाड जमिनीवरती पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी ही बाग फुलवली आहे.

या द्राक्षबागेचे दखल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने सुद्धा घेतली आहे. कृषी विभागाच्या 2016 च्या उद्यान पंडित पुरस्काराने सांगळे यांचा गौरवही करण्यात आला आहे.

सचिन सांगळे यांनी सांगितले की, सध्या ते १० एकर मध्ये १० प्लॉट तयार केलेले आहे. १० प्लॉटचे ८ दिवसांच्या अंतराने छाटणी केलेली आहे. सध्या ५० टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे. त्यापैकी ३० टक्के माल हा एक्सपोर्टसाठी दुबई, चायना, श्रीलंका येथे पाठवण्यात आला आहे आणि शिल्लक असलेला माल हा मुंबई , केरळच्या मार्केटमध्ये पाठवण्यात आलेला आहे. सरासरी दरवर्ष  द्राक्षबागेतून सरासरी एकेरी ५ लाख रुपये असा ८० ते ८५ लाख रुपयेचा टर्न ओव्हर होत आहे.

द्राक्षांच्या जाती

मर्लो
शरद
थॉमसन
माणिकचमन
[सोनाक्का]
[सुपर सोनाक्का]
अनाबेशाही
गुलाबी
बंगलोर पर्पल
काळी साहेबी
फकडी
तास-ए-गणेश
किशमिश चोर्नी
माणिक चमन
फ्लेम सीडलेस
एस.एस एन

महत्वाच्या बातम्या : –

नरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण; उजनीचे पाणी भोगावती नदीत आले

लाल कांदा हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करतो, त्याचे फायदे जाणून घ्या

मुर्रा म्हशीची ओळख कशी करता येणार, दुग्ध उत्पादन क्षमता व किंमत काय याची संपूर्ण माहिती

म्हशीच्या ‘या’ 4 जाती सर्वात जास्त दूध देऊ शकतात, वाचा संपूर्ण लेख

लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये पिवळ्या पर्णछत्राची समस्या आणि उपाययोजना

 

Leave a comment