शेतकऱ्याने खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर
हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो. हेच भिवंडी तालुक्यातील वडपे इथल्या शेतकरी असलेल्या उद्योजकाने दाखवून दिलं आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.
ग्रामीण भागात महागड्या कार फिरताना नेहमीच दिसतात. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला सुरूवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. त्यांचा व्यवसायानिमित्ताने उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे नेहमी जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे भोईर यांनी सांगितले.
येत्या 15 मार्चला भोईर यांच्याकडे हेलिकॉप्टर येणार आहे. त्यापूर्वी जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबईतून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वरपे गावात आले. अडीच एकर जागेवर संरक्षण भिंती सह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनियर सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये भोईर स्वतः न बसता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय सदस्यांना फेरफटका मारून आणला आहे. भोईर यांचं हेलिकॉप्टर येण्यास अद्याप अवधी असला तरी त्यापूर्वीच त्यांची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
महत्वाच्या बातम्या : –
पिकांचे रोग म्हणजे काय ? जाणून घ्या
जमिनीची धूप कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर
पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्यांची घेऊ काळजी!
‘या’ खतांच्या जोड्या कधीही एकमेकात मिसळू नये अन्यथा होऊ शकते नुकसान