कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी

0

भारतात सध्या दोन लसींना मंजूरी देण्यात आली असून, लवकरच लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिकृतरित्या लसीकरण सुरू होण्याआधी सरकारतर्फे देशभरात ड्राय रन केले जात आहे. लसीकरण सुरू होणार असले तरी कोणाला मोफत लस मिळणार व लसीचा खर्च केंद्र की राज्य सरकार करणार ? या प्रश्नांची उत्तरे कायम आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करायला हवा, अशी मागणी केली आहे.

एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी. लसीकरणासाठीच्या कोल्ड चेन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे. क जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर ड्राय रन केलं जाईल. याआधी दोन जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालन आणि नागपूर जिल्ह्यासह नागपूर मनपा आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये ड्राय रन करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या ‘मेवाती गायांची’ माहिती आणि त्या कुठे सापडल्या जातात

पिंपरी चिंचवडमध्ये आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे 3 रुग्ण

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर

भटक्या गायी आणि म्हशींना लागणार माइक्रोचिप; कैटल फ्री कैपिटल होणार दिल्ली

घरच्या घरी असे तयार करा अग्नी अस्त्र कीटकनाशक

Leave a comment