पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार

0

राज्यात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तर भारतात असलेली थंडीची लाट यामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पुढील चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. निफाड येथे सर्व्यात कमी  ८.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.

मराठवाड्यात अंशतः असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भात किंचित थंडी असल्याने किमान तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. इतर भागांत थंडी कमी असल्याने किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण भागांत हवामान कोरडे आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागांत चक्रिय वाऱ्यासाठी पोषक वातावरण आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे दिवसभर पडणारे ऊनही हवेहवेसे वाटत आहे.

कोकणात कडाक्याची थंडी वाढली आहे. खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत चांगलीच हुडहुडी वाढली आहे. दरम्यान उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान या भागांत थंडीची लाट आहे. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाना, चंदीगढ, दिल्ली, राजस्थान या भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपेक्षा अधिक घट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार

शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण

कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन – राकेश टिकैत

प्रचलित पेरणी पध्दतीने लागवड करतांना सोयाबिन पिकाच्या मुख्य समस्या 

Leave a comment