पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जम्मू आणि काश्मीर परिसरात बर्फवृष्टी होऊ लागली आहे. राज्यात असलेले कोरडे हवामान, उत्तरेकडून वाहत असलेले थंड वारेचे प्रवाह यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तरांखड या भागांत थंडीची लाट आली आहे. या भागात दिवसही थंड अनुभवास येत आहे.
या थंडीमुळे राज्यातील काही भागांत किमान तापमानाचा पारा खाली येऊ लागला आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागांत थंडीची लाट राहणार आहे.
गेल्या २४ तासात गोंदिया येथे नीचांकी ११ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. राजस्थानच्या पूर्व भागातील सिकर येथे १.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.
सध्या राज्यात आकाश निरभ्र असल्याने थंडी चांगलीच वाढली आहे. मराठवाड्यातही बऱ्यापैकी थंडी आहे. त्यामुळे परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात १३.५ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद, उस्मानाबाद भागांतही थंडी आहे. कोकणात थंडीत चढउतार असून ठाणे, डहाणू परिसरांत चांगलीच थंडी आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी भागांत थंडी काहीशी कमी असल्याने किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडी वाढली असून, किमान तापमानात मोठी घट झाली आहे. या भागात ११ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. पुणे, जळगाव, नाशिक, निफाड, महाबळेश्वर या भागांत चांगलीच थंडी आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांत थंडी काहीशी कमी आहे.
विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २२ (५), ठाणे १९, अलिबाग २१.३ (४), मालेगाव १९.६ (८), नाशिक १६.८ (७), निफाड १५, सांगली १८ (४), सातारा १६ (४), सोलापूर १८.५ (३), औरंगाबाद १५.८ (३), बीड १७.४ (४), परभणी १७.४ (३),रत्नागिरी २२.२ (३), डहाणू २०.३ (३), पुणे १५.९ (५), जळगाव १५.७ (३), कोल्हापूर १९.३ (४), महाबळेश्वर १५.५ (२),अमरावती १५.५ (१), बुलडाणा १५.८ (१), चंद्रपूर १७.४ (३), गोंदिया ११ (-२), नागपूर १५ (२), वर्धा १५.९ (३), यवतमाळ १६ (१) परभणी कृषी विद्यापीठ १३.५, नांदेड १८ (४), उस्मानाबाद १४.९, अकोला १६.६ (२).
महत्वाच्या बातम्या : –
कांदा पिकावरील विविध रोगांची लक्षणे रोगास प्रतिकूल उपाय या संबंधीची माहिती
जाणून घ्या कश्याप्रकारे योग्य खते निवडावी
चारा खातांना गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी करा ‘हा’ उपाय
‘शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार’
कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणतात…..