मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास

0

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी सुद्धा मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असल्याचे चित्र साध्या घडीला पाहायला मिळत आहे.

मुंबईचे किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ तर किमान तापमानात ५ अंशांची वाढ झाली आहे. पुढील काही दिवस ही वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून माझगाव, वरळी, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवलीसह नवी मुंबई प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. त्यात आता मुंबईतील थंडीचा जोरदेखील ओसरला आहे. किमान तापमान १६ अंशांवरून थेट २२ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांहून ३४ अंशांवर दाखल झाले आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी म्हणजेच १४ जानेवारी २०२१ रोजी आकाश मोकळे होते. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत होते. कमाल तापमान ३० अंशांवर दाखल झाले असून, त्याचा वाढता पारा मुंबईकरांचा घाम काढत आहे.

वाढता उष्मा आणखी काही दिवस तापदायक ठरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मात्र प्रदूषण कायम नोंदविण्यात येत आहे.  विशेषत पुढील पाच ते सहा दिवस उष्मांक वाढता राहील. त्यानंतर विदर्भ येथील किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आणि सरकारची आज नववी बैठक

कांदा खत व्यवस्थापन

गव्हावरील तांबेरा रोग

वेस्ट डिकंपोजर

दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची केली पाहणी

Leave a comment