गव्हावरील तांबेरा रोग

0

व्यवस्थापन

तांबेरा रोगास प्रतिकारक्षम वाणांची पेरणी करावी. (उदा. फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एन.आय.ए.डब्लू. ३४, एम.ए.सी.एस. ६२२२, एम.ए.सी.एस. ६४७८, गोदावरी, पंचवटी इत्यादी). परिसरातील शेतकऱ्यांनी एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी प्रतिकारक्षम विविध गहू वाणांची पेरणी करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात अंतर ठेवावे.

गव्हाची पेरणी थंडीला सुरवात झाल्यावर १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. उशिरा पेरणीसाठी फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू-३४ हे तांबेरा प्रतिकारक्षम वाण पेरावे.

रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.

भारी जमिनीत पिकास पाणी देताना पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावेबणे मध्यम ते भारी जमिनीत १८ ते २१ दिवसांच्या अंतराने व हलक्‍या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.

रोगाचा प्रादुर्भाव होताच, प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

महत्वाच्या बातम्या : –

वेस्ट डिकंपोजर

दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची केली पाहणी

सुधारित तंत्राने करा बटाटा लागवड

भारतीय गायींच्या ‘या’ जातींना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी

पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार

Leave a comment