हिवाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी

0

अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी

जनावरांची हिवाळ्यात घ्यावयाची काळजी गेल्या आठवड्यापासून तापमानात अचानक घट झालेली आहे . रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा कडक ऊन अशी विषम परिस्थिती तयार झाली आहे . हा ऋतू आरोग्यदायक असला तरी लहान करने , कोकरे , वासरे यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे . त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे . त्यासाठी छ जनावरांच्या गोठ्यांना बारदान किंवा शेडनेटचे पडदे लावावेत गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० वॉटचे बल्व गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावेत .

शक्य झाल्यास गे ठ्यामध्ये शेकोटी पेटवावी .गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत , कडवा , गोणपाट यांची बिछायत टाकावी . 8 गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी . त्यासाठी तर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा . थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे .

विशेषत

गाभण गायी – म्हशींची जास्त काळजी घ्यावी . 8 जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावराच्या आहारात शेगदाणा पेंड , सरकी पेंड यांचा वापर वाढवावा . & शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा . क्षार व जीवनसत्त्वाचे मिश्रण वाढवावे . सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे , जाणेकरून गवतावर दहिवर नसेल , गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत . सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टरपेटाइनचा बोळा फिरवावा .

सर्दीचा रंग हिरवट – पिवळसर असल्यास तातडीने पशुवैद्यकाचा  सल्ला घ्यावा . जनावराचे पिण्याचे पाणी अतिथंड नसावे जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत , 1 लाळ्या खुरकूत आजारापासून संरक्षणासाठी जनावरांना लसीकरण करावे .अशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजीअशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजीअशी घ्या हिवाळ्यात जनावरांची काळजी.

Leave a comment