शेळ्यांना खुराकदेत असतांना घ्या ‘हि’ काळजी

0

1) मका, गहू इ खुराक म्हणून देत असताना तो भरडून, भुसा करून किंवा मग पीठ करून शेळ्यांना खाऊ घालावा असं माझं मत आहे.

2) शेळीच्या रुमेन मध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना चावून बारीक केलेलं पदार्थ पचवायला सोपे जातात, त्यामानाने पदार्थाचे आकारमान मोठे असेल तर ते पचवायला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ शेळीकडे नसतो.

3) शेळी चरत असताना, या ठिकाणी खुराक खाताना ती बहुदा अजिबात चावत नाही, भराभर तसेच गिळते. जेंव्हा ती रवंथ करते तेंव्हा ती रुमेन मधील अन्न रुमेन मधील बॅक्टेरियाना वारंवार बारीक करून देत असते. असे बारीक झालेले व पचलेले अन्न पुढे रेटिकूलम मध्ये जाते. या रेटिकूलम मध्ये अन्नातील मोठे पदार्थ अडवले जातात. थोडक्यात रेटिकूलम गाळण करण्याचे काम करतो.

4) असे असले तरी रेटिकूलम मधून बारीक न झालेले गहू किंवा मका दाणे आतड्याच्या पुढच्या कप्प्यात जातातच. तेथून पुढे हे बारीक न झालेले दाणे पचन होत नाहीत व लेंडीतून बाहेर पडतात.

5) जर मका किंवा गहू भुसा किंवा पीठ करून खाऊ घातले तर रवंथ प्रक्रियेत ते बारीक होण्याचा प्रश्न राहत नाही, त्यामुळे संपूर्ण खुराक शेळीच्या पोटात पचतो, लेंडीतून बाहेर येत नाही.

6) मका किंवा गहू किंवा इतर कोणतेही बी बारीक न करता, म्हणजेच भुसा, भरडा किंवा पीठ न करता आहे तसेच शेळ्यांना खाऊ घालावेत.

7) जेंव्हा मका/ गहू बी रवंथ साठी तोंडात येतात तेंव्हा त्यातील पिष्टमय पदार्थामुळे तोंडात जास्तीची लाळ तयार होते. हि लाळ पुन्हा पोटात गेल्यामुळे पोटातील सामू नियंत्रित राहतो.जर भुसा किंवा पीठ खाऊ घातले तर रवंथ मध्ये लाळ तयार होत नाही.

8) भुसा किंवा पीठ पोटात गेल्यानंतर बॅक्टेरिया द्वारे ते लवकर पचवले जाते, हा कालावधीत ऍसिड ची निर्मिती होत असते. त्यामुळे शेळीला रुमीनल असिडोसिस नावाचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जर दाणे रवंथ प्रक्रियेत बारीक झाले व हळू हळू बॅक्टेरियाना उपलब्ध झाले तसेच तोंडातील लाळ रुमेन मध्ये अली तर सामू नियंत्रित राहतो व असिडोसिस होण्याची शक्यता कमी होते.

महत्वाच्या बातम्या : –

उन्हाळी भुईमूग उत्पादन वाढीचे सप्तसुत्रे

अश्या प्रकारे तयार करा दशपर्णी अर्क

बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका – उद्धव ठाकरे

पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना

देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता

Leave a comment