सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डवर, आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

0

दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझिपूर बॉर्डवर पोहोचल्या आहेत.

विरोधी पक्षांच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ हे गाझीपूरच्या सीमाभागात पोहोचलेला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे शिष्टमंडळ पोहोचला आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेते व माजी मंत्री हरसिमरत कौर, डी.एम.के. पक्षाच्या कनिमोझी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास 10 विरोधी पक्षाचे 15 पेक्षा जास्त नेते पोहचले आहे.

दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.

71 दिवसांपासून गाझिपूरसह दिल्लीतील वेगवेगळ्या सीमा भागांमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारनं लागू केलेली कृषी कायद्यातील धोरणं मागे घ्यावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या : –

‘या’ ठिकाणी पिकतेय जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत तब्बल 82 हजार रुपये

पाने पिवळी पडतात त्यावर उपाय

रुटस्टॉक बागेची छाटणी कशी करावी?

शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर म्हणाल्या….

‘हे हिटलरचे सरकार आहे’ – प्रकाश आंबेडकर

Leave a comment