शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

0

दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकरी संघटनांनी आता २६ जानेवारी २०२१ रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याविरोधात दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्या बाबत आज म्हणजेच १८ जानेवारी २०२१ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की ‘‘कृषी पिकांचे अवशेष जाळणे आणि वीजेबाबतच्या शंकाही सरकार दूर करू इच्छिते. शेतकरी संघटनांनी कायदे माघारी घेण्याचा हट्ट सोडावा, आम्ही त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करू.’’

केंद्र सरकारने दहाव्या फेरीच्या चर्चेमध्ये बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या नोंदणी बाबतच्या शंका दूर करण्यासाठी नवा प्रस्ताव दिला आहे., अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

दरम्यान, दुसरीकडे ‘‘सत्तेत असताना काँग्रेसने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये का दिले नाहीत. पंतप्रधान पीक विमा  योजना का सुरू केली नाही,’’ असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. कर्नाटकातील बागलकोट येथे विविध शेतकरी योजनांच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी लागू करीत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या : –

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक

बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक

भेंडी खाऊन घटवा वजन

कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार

गायींना होणारे आजार व त्यावरील घरगुती उपचार

 

Leave a comment