अहमदनगरमध्ये यंदाच्या गाळप हंगामात साखर उताऱ्यात घट

0

अहमदनगर  जिल्ह्यात यंदा गाळप हंगामात २३ पैकी २१ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र यंदाचा साखर उतारा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. असे असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खासगी कारखानेच पुढे आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक साडेपाच लाख टन उसाचे अंबालिका कारखान्याने गाळप केले आहे. शेतकऱ्यांना दिला जाणारा उसाचा दर साखर उताऱ्यावर ठरतो. यंदाचा साखर उतारा मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. सध्या साखर उतारा कमी असला तरी कारखान्याचा गाळप हंगाम संपतेवेळी सरासरी उताऱ्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उतारा कमी असल्याने पुढील वर्षी दरात फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी ८.५ टक्के असून, खासगी साखर कारखान्यात ८.४२ आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.३१ आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.५० एवढा होता.

यंदा आतापर्यंतच्या साखर उताऱ्यात सर्वाधिक १०.५ टक्के एवढा साखर उतारा नागवडे (श्रीगोंदा) कारखान्याचा आहे. खासगीमध्ये सर्वाधिक ९.१९ टक्के साखर उतारा अंबालिका साखर कारखान्याचा आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी ८.५ टक्के असून, खासगी साखर कारखान्यात ८.४२ आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.३१ आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.५० एवढा होता, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले.

जिल्ह्यात असलेल्या १४ सहकारी व ९ खासगी साखर कारखान्यांपैकी १३ सहकार व ८ खासगी साखर कारखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यात सहकारी कारखान्यांनी ३० लाख, तर खासगी कारखान्यांतून १५ लाख टन गाळप झाले आहे. दैनंदिन गाळपात मात्र खासगीच आघाडीवर आहेत.

 

 

Leave a comment